
पिंपरी: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ(मंत्री दर्जा) व सदस्य गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा) यांचा आज पुणे जिल्हा दौऱ्यादरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत आढावा व कामकाजाची पाहणी केली. त्यांचे स्वागत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देऊन बैठकीमधल्या विविध समस्या सोडवण्याबाबत सांगण्यात आले. गोरक्ष लोखंडे यांनीही विविध विषयांना योग्य मार्ग काढून नागरिकांना न्याय मिळावा यासाठी सांगितले.
- बैठकीनंतर साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्रकाचे संस्थापक व संपादक व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख.. दत्तात्रय कांबळे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यांना साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्राच्या अंक देण्यात आला. त्यांनीही साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र गेले 17 वर्ष नियमित प्रकाशित होत असल्याबद्दल व अठराव्या वर्षात यशस्वी पदार्पण होत असल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित
- होत