चिंचवड:(सा. प्रगत भारत) पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. विरोधी पक्षनेते श्री विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या


15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या  वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचे सहकारी मच्छिंद्र काटे,राहुल काटे,हर्षल काटे,सचिन झिंजुर्डे, प्रतीक काटे, श्रेयस काटे, संतोष काटे, उदय माझीरे, ओंकार काटे, भूषण काटे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे देणगी जमा केली.
येत्या 15 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराला 22 किलो सोन्याचा सुवर्णकलश बसवण्यात येणार आहे.
यावेळी हि देणगी नाना काटे यांच्या हस्ते संस्थान चे विश्वस्त ह.भ.प.पुरुषोत्तमदादा पाटील यांना सुपूर्त करण्यात आली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिषेक करून मनोभावे दर्शन घेऊन नानांच्या  भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version