पिंपरी: डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, पिंपरीच्या संगणक विज्ञान विभाग,
बी.एससी. सायबर आणि डिजिटल सायन्स व एम.एससी. सायबर सिक्युरिटी विभाग आणि XIT ग्रुप
यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘फ्लॅग हंटर सायबर हॅकाथॉन 2025’ चे आयोजन करण्यात आले.
विशेष म्हणजे, XIT ग्रुपचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहित कांबळे हे डॉ. डी. वाय. पाटील
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी सायबर सुरक्षा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण
केली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांतील 350 हून
अधिक संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी क्रिप्टोग्राफी, वेब एक्सप्लॉइटेशन, रिव्हर्स इंजिनिअरिंग
आणि फॉरेन्सिक्स यांसारख्या सायबर सुरक्षा समस्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेच्या पहिल्या दोन
फेऱ्या ९ आणि १० मार्च रोजी ऑनलाईन पार पडल्या, तर अंतिम फेरी प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात
आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, संगणक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील,
बी.एससी. सायबर आणि डिजिटल सायन्स व एम.एससी. सायबर सिक्युरिटीचे समन्वयक श्री. सत्यवान
कुंजीर, तसेच इव्हेंट समन्वयक श्री. सम्मेद बुकशेटे आणि सायबर तज्ञ श्री. तुषार जाधव यांनी महत्त्वपूर्ण
भूमिका बजावली.
एमआयटी (WPU) च्या शिरीष शिवकुमार सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला, पारुल युनिव्हर्सिटी
(गुजरात) चे विद्यार्थी अथर्व सचिन तोरस्कर आणि गोस्वामी विवेक रमेशगिरी यांनी द्वितीय क्रमांक
मिळवला, तर कमिन्स कॉलेजची विद्यार्थिनी तनिषा चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना
प्रमाणपत्र, रोख बक्षीसे, ट्रॉफी आणि XIT ग्रुपमध्ये इंटर्नशिपची संधी प्रदान करण्यात आली.