चिंचवड (दि. 23 जून 2025) :-  आपल्या संत भूमीचा, संत संस्कृतीचा वारसा अविरत चालू ठेवण्यासाठी , चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट च्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी वारी निमित्ताने, महाविद्यालयाच्या इको क्लबच्या माध्यमातून “स्वच्छता वारीचे” नियोजन केले होते. त्यात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कार्यक्रमानंतर प्रतिभा ज्युनिअर कॉलेज इको क्लब ने “स्वच्छता वारी” अंतर्गत कचरा संकलन मोहीम आयोजित केली. या उपक्रमाचा उद्देश समाज आणि राष्ट्रांमध्ये स्वच्छतेचे महत्व व त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.

कचरा संकलनामध्ये कला,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय जबाबदारी मध्ये सामुदायिक सेवेला प्रोत्साहन देण्यात सक्रिय सहभाग घेतला.

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित “स्वच्छता वारी” या कार्यक्रमास इको क्लबच्या समन्वयिका प्रा. सुनीता गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि तसेच इतर सर्व इको क्लबचे उत्स्फूर्त सदस्य, सर्व प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी यांनी हा उपक्रम पूर्णत्वास नेला.

संस्थेच्या अध्यक्षा  प्रतिभा शाह, सचिव डॉ दीपक शहा, त्याचबरोबर संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा व संचालिका तेजल शहा यांनीही या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version