मोशी:(सा. प्रगत भारत) येथील देहू आळंदी या मध्यभागी असलेल्या मोशी गावचे सुपुत्र तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत असलेले काम एक तरुण धडपडणारा व सामाजिक हित घेऊन मोशी गावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी अहोरात्र झटणारा व प्रगतीपथावर नेणारा सामाजिक कार्यकर्ता आपला माणूस म्हणून मोशी गाव मध्ये ओळखला जाणारा निलेश उद्धव बोराटे यांचा 13 ऑगस्ट २०२५ रोजी वाढदिवस  सामाजिक उपक्रम म्हणून व समाज बांधिलकी म्हणून साजरा होत आहे…. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश बोराटे सोशल फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार व गरजू युवकांसाठी भव्य नोकरी महोत्सव याचे आयोजन आज 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते 4.00  या वेळेत स्थळ:- वैशाली स्वीट शेजारी अंशुल कॉसमॉस ग्राउंड अनंत नग र देहु रस्ता मोशी येथे आयोजित करण्यात आल्याचे साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब न्यूज www.pragatbharat.com न्यूज चैनला बोलताना निलेश बोराटे यांनी सांगितले. तसेच त्याच दिवशी 13 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध परिसरात व सोसायटीमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार  असून तसेच मोशी परिसरातील भजनी मंडळ यांचा जाहीर सन्मान करण्यात येणार असून  तसेच सफाई कामगार सन्मान व अनाथ आश्रम अन्नदान तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन अशा विविध स्वरूपाचा समाज हित जपत वाढदिवस साजरा होत आहे. निलेश बोराटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की आमचे मार्गदर्शक व भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले असून मोशी परिसरातील समस्त नागरिक व हितचिंतक यांना निलेश बोराटे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर निमंत्रण केले आहे. तरी या वाढदिवसाचा व समाज उपयोगी कार्यक्रमाचा मोशी परिसरातील नागरिकांनी व युवकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे  सांगण्यात आले आहे नोकरी महोत्सवामध्ये पाचवी ,दहावी बारावी ,बीए ,बीकॉम ,एम कॉम, एम एस डब्ल्यू, आयटीआय सर्व विषय डिप्लोमा बीई मेकॅनिकल आज विविध क्षेत्रातील नोकरी संदर्भात येथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी संधी आहे यासाठी नामांकित कंपन्या यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. अधिक माहितीसाठी 7610787878 संपर्क साधावा असे सांगितले आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version