पिंपरी चिंचवड शहरांमधील सामाजिक, शैक्षणिक ,उद्योग क्षेत्र  व राजकीय क्षेत्रातील वारस असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व शिवसेना पक्ष(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर तसेच शिवसेना संघटक मावळ लोकसभा माननीय श्री संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा 24 ऑगस्ट 2025 हा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरांमधील विविध संस्था व पक्षाच्यावतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा होत आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्या सह पत्नी सौ. उषाताई संजोग वाघेरे पाटील या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका असून तसेच सदस्य पुणे जिल्हा समिती ,मा. स्थायी समिती अध्यक्षा होत्या. तसेच संजोग वाघेरे पाटील यांचे सुपुत्र ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक काम करत आहे एक युवाशक्ती उद्याची देशाची व आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या राज्याचे नेतृत्व व प्रगत महाराष्ट्र करण्यासाठी निश्चितच काम करत आहे. यामध्येही ऋषिकेश एक सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यालाही सामाजिक कामाची आवड आहे या सर्व वाघेरे परिवारामधील माहिती घेता निश्चितच त्यांच्या मागे सामाजिक व राजकीय कामाचा वारसा आहे हे निश्चित आहे.
संजोग वाघेरे यांचे वडील स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवड  महापालिकेचे माजी महापौर म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांना सामाजिक राजकीय आदी क्षेत्रातील माहिती लहान वयापासूनच वाचण्यास व पहावयास मिळत होती.  त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे सुरू असलेले सामाजिक व राजकीय काम निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात येथील नागरिक … त्यांच्या मनोकामना पूर्ण करतील… साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब न्यूज पोर्टल www.pragatbharat.com च्या वतीने संपादक दत्तात्रय कांबळे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक संपर्क नंबर ९८६०८७७७८९  शुभेच्छा!…
Share.
Leave A Reply

Exit mobile version