बुधवार दिनांक १५ रोजी दीपोत्सव साजरा झाला. दिवाळी हा सण म्हणजे “प्रकाशाचा उत्सव” शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सारिका
विधाते मॅडम यांनी मुख्य दिवा लावून कार्यक्रमाच्या सुरुवातीचे शुभारंभ केले. त्यानंतर, इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी काढून त्यावर दीवे ठेवून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला.वर्गशिक्षिका रुपाली कुलथे यांनी सर्वांना शुभेच्छा देताना ही दीपावली आपणांस प्रकाशमय व आनंदी जावो अशी सदिच्छा व्यक्त केली . दीपोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये एकता, सहकार्य आणि सांस्कृतिक कल्याणाची भावना दृढ झाली. या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थीनी, शिक्षक वृंद मनिषा धनलोभे, प्रशांत शिरवले , सुरेखा कुंजीर, प्रविण शिंदे , संगिता शिंगोटे, पुष्पा अहिरे, जयश्री इनामदार, राजकुमार जराड,मेधा देशपांडे, सविता पवार, रेखा गाडे, शुभांगी क्षीरसागर, राजू खेडकर,सुरज साळुंखे हे या कार्यक्रमात सहभागी झाले.यामुळे शाळेचे वातावरण आनंदी व उत्साही झाले.