पिंपरी (Pragatbharat.com):-  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाजपच्या ८४ नगरसेवकांनी एकमताने नगरसेवक प्रशांत शितोळे यांची भारतीय जनता पार्टी गटनेते म्हणून निवड केली.
या बैठकीत पक्ष संघटनेच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात आला असून, प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वावर सर्व नगरसेवकांनी विश्वास व्यक्त केला. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील भारतीय जनता पार्टीच्या ८४ नगरसेवकांचा “पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट” म्हणून अधिकृत गट नोंदणी करण्यास पक्षाने मान्यता दिली आहे.या संदर्भात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून, पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून, शहराच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
Share.
Leave A Reply

Exit mobile version