• सभागृहात भाजपचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांची सत्तारूढ पक्षनेतेपदी , तर भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी
  • पिंपरी 🙁 pragatbharat.com) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची निवड झाली.

दरम्यान सभागृहात भाजपचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांची सत्तारूढ पक्षनेतेपदी तर, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार त्यांना माघारीसाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आली. विहित मुदतीमध्ये रवी लांडगे यांनी माघार घेतली नाही. त्यानंतर निवडणूक अधिकारी सभेचे अध्यक्ष सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ११ वाजून २० मिनिटांनी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी माघार घेतली. यामुळे शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.यावेळी आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे, उमा खापरे यांनी महापौर आणि उपमहापौर यांना निवडीनंतर शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version