पुणे :(pragatbharat.com) पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि कॉंग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे दत्तात्राय बहिरट आणि  कॉंग्रेसचे साहिल केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे या निवडणुकीत नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित झाले आहेत.
 
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी मुळचे आरपीआयचे असलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडुन आलेले परशुराम वाडेकर यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले.

सिहंगड रस्त्याला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार

निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रस्ता परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे.

पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होणार

भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर झाले आहेत. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पती उपमहापौर झाले आहेत.
Share.
Leave A Reply

Exit mobile version