नवी दिल्ली : ( pragatbharat.com) भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर सहमती झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. तसेच करार करण्याचा निर्णय मोेठा असल्याचे ते म्हणाले.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षाच्या खासदारांची बैठक काल झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. कराराचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला होईल. सरकार नेहमीच देशाचया हिताचे निर्णय घेत आले आहे. युरोपीय महासंघ आणि अमेरिकेसोबत व्यापार करार झाल्याबद्दल खासदारांनी मोदी यांचे अभिनंदन केले. करारामुळे उत्पादक, निर्यातदार आणि उद्योजकांचा मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
भारतावर ५० टक्के शुल्क लागू आहे. भारत आणि अमेरिकेने एका व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे, ज्या अंतर्गत अमेरिका भारतीय वस्तूंवरील परस्पर आयात शुल्क एकूण ५० टक्क्यांवरुन १८ टक्क्यांपर्यंत खाली आणेल. २ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या एका ऐतिहासिक व्यापार करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील एकूण आयात शुल्क ५० टक्क्यांवरुन १८ टक्क्कांपर्यत कमी केले आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिज्जू यांनी करार देशासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्ववाखाली ३९ देशांसोबत व्यापार करार झाल्याचा आनंद खासदारांनी व्यक्त केला. करार ऐतिहासिक आहेत. त्यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रत्युत्तर शुल्कात कपात

अमेरिकेने प्रत्युत्तर आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यत कमी करण्यची घोषणा केली,.

दंडात्मक शुल्काची समाप्ती

भारताने रशियचे खनिज तेल खरेदी केल्यामुळे भारतावर यापूर्वी लावलेले अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्क अमेरिकेने पूर्णपणे रद्द केले आहे.
Share.
Leave A Reply

Exit mobile version