Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी
पिंपरी चिंचवड

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comDecember 10, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नागपूर, दि. १० आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभागृहात पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागातील गंभीर अनियमितता, अतिकर आकारणी आणि नियमबाह्य बिले वसूल केल्याच्या प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी व्यापक, मुद्देसूद आणि आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले.

आमदार गोरखे यांनी सांगितले की स्थापत्य कन्सल्टन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ₹47 कोटींचे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. त्यानंतर ‘ड्रोन सर्वेक्षण’ या नावाखाली अतिरिक्त ₹29 कोटी रुपये वाढवून घेतल्याची बाब समोर आली. या ड्रोन सर्वेक्षणाचे प्रत्यक्षात झालेले काम किती? त्याच्या बिलांची पडताळणी कोणी केली? फ्लाईंग डाटा , प्रत्यक्ष तपासणी आणि तांत्रिक चाचणी अहवाल घेण्यात आले का? या सर्व प्रश्नांबाबत गोरखे यांनी सभागृहात गंभीर शंका व्यक्त केल्या.

गोरखेंनी नमूद केले की: ठेकेदारांकडून नागरिकांना चुकीची, नियमबाह्य, आणि जादा कर आकारणी करण्यात आली.
अनेक नागरिकांनी तक्रारी करताना सांगितले की बोगस मोजमाप, चुकीच्या पद्धतीची नोंद, आणि सुधारित कर आकारणीच्या नावाखाली त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले गेले. महानगरपालिकेने याची थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आमदार गोरखे यांनी पुढे विचारले: नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले आहे का? चुकीची व फुगवलेली बिले देऊन महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे का? जर झाले असेल तर चौकशी कोणाकडे आहे आणि आतापर्यंत कोणती कारवाई झाली? असा सवाल यावेळी विचारण्यात आले.
सर्वेक्षणात 3,70,213 मालमत्तांची कर वसुलीच झालेली नाहीमग याचे कारण काय? यामुळे महानगरपालिकेला आतापर्यंत किती कोटींचा तोटा झाला? हा तोटा जबाबदारी कोणाची? असल्याचे देखील सभागृहाच्या लक्षात आणून दिले
गोरखे म्हणाले:
“लाखो नागरिकांकडून चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाली असेल, तर तो पैसा पालिकेने परत केला पाहिजे. हा पैसा जनतेचा आहे, कोणत्याही ठेकेदाराचा नाही.” परत करण्यसाठी कोणती योजना आखली आहे का असा थेट सवाल यावेळी विचारण्यात आला.

प्रश्नाला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले: या कंपनीला 5 लाख 80 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण टार्गेट देण्यात आले होते. नैसर्गिक वाढीने अतिरिक्त 40 हजार मालमत्ता यात जोडल्या जाणार होत्या. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच आयुक्तांकडे चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले जातील व चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीला उर्वरित बिल अदा केले जाणार नसल्याचे मंत्री मोहदायानी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक
Next Article कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

प्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.

January 7, 2026

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे..

January 7, 2026

निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे..

January 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

By pragatbharat@gmail.comJanuary 11, 20260

पिंपरी (दि. 11 जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि.…

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

January 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.