Prime Minister Narendra Modi S Special Message On His Special Anushthan Ahead Of Pran Pratishtha At Ram Lalla Ram Temple In Ayodhya Ram Mandir Pran Pratistha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Pran Pratistha Special Anushthan : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रतिष्ठापनेसाठीचं (Pran Pratishtha) 11 दिवसांचं अनुष्ठान नाशिकच्या भूमीवरून सुरू करणार आहेत. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अनुष्ठान करणार असून त्याची सुरुवात आज नाशिकमधून करणार आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक साधू संत, विद्वानांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी  11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहे, ज्याला आजपासून सुरुवात होत आहे.

पंतप्रधान मोदींचं 11 दिवसांचं खास अनुष्ठान

या संदेशामध्ये पंतप्रधाम मोदी यांनी म्हटलं आहे की, “अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला फक्त 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मी देखील या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने मला निर्माण केले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठान सुरु करत आहे.” असं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचा खास संदेश

 

 



[ad_2]

Related posts