NCP leader jitendra Awhad slams Ajit pawar faction over rohan bopanna wins australian open 2024 News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीचं सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. अशातच आता  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्नाला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते याचं उदाहरण त्याने दिलंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.  

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन..! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांनी वय बघून आता राजकारणातून संन्यास घ्यावा असं अजित पवार यांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय. मात्र, शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षीही राजकारणात सक्रीय आहेत. गेल्या 4 दशकाहून अधिक त्यांची राजकीय कारकीर्द राहिलीये. त्यामुळे  काही नेते वयस्कर झाले तरी बाजूला होत नाहीत, तरूणांना संधी देत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी ताजं उदाहरण देऊन अजित पवारांवर निशाणा साधलाय.

Related posts