Interim Budget 2024 government is working towards providing cervical cancer vaccine for 9 to14 year old Nirmala Sitharaman Budget Speech Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Interim Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोगा सांगितला. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासाबाबत भरपूर समावेश करण्यात आला आहे. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मिशन ‘इंद्रधनुष’ अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्प 2024 चे ठळक मुद्दे 

  • केंद्र सरकार 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस मोफत पुरवणार आहे.
  • आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. 
  • माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल, एफएम म्हणाले, माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल.

‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ लस बनवणार 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वाइकल कॅन्सर टाळण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित करेल, जी HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते – 16, 18, 6 आणि 11. SII चे CEO आदर पूनावाला यांनी आधीच सांगितलं होतं की, या लसीची किंमत 200-400 रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस 2,500 ते 3,300 रुपये आहे.

सिक्कीम सरकारची मोहीम सुरू

सिक्कीम सरकारनं 2016 मध्ये GAVI नावाची लस खरेदी केली आणि ही लस 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. आकडेवारी दर्शवतं की, सिक्कीम सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमांतर्गत 97 टक्के मुलींचं लसीकरण करण्यात आलं. आता ते नियमित लसीकरणाचा भाग म्हणून प्रदान करतात आणि कव्हरेज टक्केवारी सुमारे 88 ते 90 टक्के आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात… 

  • टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
  • 10 वर्ष जुन्या 10 हजार रुपयांपर्यंतचा कर माफ
  • राज्यांना 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज
  • जुलैच्या अर्थसंकल्पात भारताचा रोडमॅप विकसित झाला
  • 3 कोटी महिला लखपती दीदी बनतील
  • 5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं
  • पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च
  • वंदे भारतमध्ये 40 हजार रेल्वे बोगी बदलण्यात येणार 
  • लक्षद्वीपच्या विकासासाठी विशेष योजना
  • 3 नवे रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा

अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात 1 कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचं उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आलं असून 3 कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts