pune md drugs bust connection reaches delhi over 2000 kgs md drugs worth over rs 4000 crores seized till now

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Drugs News : पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी  कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेय. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली. पुण्यातील ड्रग्जची व्यप्ती आणखी मोठी असल्याचं अनेकांचं मत आहे.  

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोमवारी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तेथूनच पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सुत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या.  पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. त्यानंतर दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारली. जिथे ड्रग्जची निर्मिती होत होते. येथे पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचेही तपासात समोर आले. 

मिठाच्या पाकिटात लपवला ड्रग्ससाठा –

वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्स विक्री करायचे. साधा ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्ससाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता. 

आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर – 

19 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले. पुणे (Pune)  पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे  विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांनी कुठे किती ड्रग्ज पकडले  ?

दिल्लीत मिळून आले आणखी 600 किलो एम डी ड्रग्स

दिल्लीतील दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

अवघ्या ३ दिवसात पुणे पोलिसांनी जप्त केले 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एम डी ड्रग्स

पुणे पोलिसांचे पुणे, कुरकुंभ सह दिल्लीत छापेमारी

गेल्या 3 दिवसात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई

फेब्रुवारी 18 : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये 2 किलो एम डी जप्त

फेब्रुवारी 19 : विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एम डी जप्त

फेब्रुवारी 20: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स आले आढळून

फेब्रुवारी 20 : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 800 कोटी रुपयांचे 400 किलो एम डी केले हस्तगत

फेब्रुवारी 21 : पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाई मध्ये दिल्लीत मिळून आले 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो एम डी

इतर महत्वाची बातमी-

मीठ विक्रीच्या आडून अमली पदार्थांची तस्करी, पुण्यात 100 कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्स जप्त; आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts