Laptop Tips loud laptop fans how to fix step by step process marathi news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Laptop Tips : अनेकदा आपण वापर असलेल्या लॅपटॉपच्या (Laptop) पंख्यातून आवाज येत असतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेलच. अशा वेळी लॅपटॉप जुना झाला असेल म्हणून आवाज येत असेल असं बोलून आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो. पण, तुम्हाला माहीत आहे का लॅपटॉपच्या पंख्यातून आवाज येणं याचा लॉपटॉपच्या नवीन किंवा जुना असण्याशी काहीही संबंध नाही. ही समस्या कोणत्याही लॅपटॉपमध्ये होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुमचा लॅपटॉप फॅन देखील मोठा आवाज करत असेल तर तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यानंतर तुमचा लॅपटॉप उत्तम प्रकारे काम करेल.

जर तुमच्या लॅपटॉपच्या फॅनमधून घरघर असा आवाज येत असेल किंवा ड्रॅगिंगचा आवाज येत असेल तर यामागे दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुमचा डिव्हाईस जास्त गरम झाला आहे आणि दुसरं कारण म्हणजे लॅपटॉपमधला एखादा पार्ट तुटलेला आहे. तुम्ही घरी बसूनसुद्धा ही समस्या दूर करू शकता. कशी ते जाणून घ्या. 

‘या’ कारणामुळे लॅपटॉपच्या फॅनमधून आवाज येतो 

बऱ्याचदा जर तुम्ही लॅपटॉप जास्त वापरत असाल तर ते अतिरिक्त उष्णता निर्माण करते आणि पंख्याला थंड होण्यासाठी ओव्हरटाईम काम करण्यास भाग पाडते. अतिउष्णतेमुळे तुमचे डिव्हाईस देखील बंद होऊ शकते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

  • तुमचा लॅपटॉप एका हार्ड फ्लॅट सरफेसवर ठेवा. त्यातील साचलेली घाण स्वच्छ करा.  
  • यानंतर, बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले प्रोग्राम्स बंद करा. लॅपटॉपमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस किंवा मालवेअर असल्यास ते काढून टाका.
  • तुमचा सिस्टम मॅनेजमेंट कंट्रोलर (SMC) आणि तुमचा पॅरामीटर रॅंडम एक्सेस मेमरी (PRAM) रीसेट करा. यानंतर तुमचे ड्रायव्हर्स अपडेट करा.

विंडोजवरून बॅकग्राउंड प्रोग्राम्स ‘असे’ बंद करा 

यासाठी तुम्हाला Ctrl + Alt + Delete या बटणाला प्रेस करावं लागेल. त्यावर राईट क्लिक करून प्रोग्राम बंद करा. शेवटी End Task वर क्लिक करा.

Mac वर पार्श्वभूमी प्रोग्राम कसं बंद कराल?

Cmd + Space बटण दाबून स्पॉटलाईट लाँच करा. नंतर “ Activity Monitor” सर्च करा. त्यानंतर दुसरं फोल्डर ओपन करा.या ठिकाणी ॲक्टिव्हिटी मॉनिटर आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला जो प्रोग्राम बंद करायचा आहे त्यावर डबल-क्लिक करा. त्यानंतर पॉपअप विंडोमध्ये Quit बटण दाबून एक्झिट करा.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच ‘या’ 3 गोष्टी करा; अन्यथा… तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता

अधिक पाहा..

Related posts