Manoj Jarange colleague Maratha protester Gangadhar Kalkute car attacked Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. यावेळ वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे यांचे सहकारी असून, त्यांच्यावर गाडीवर हा हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातील सहकारी असलेले बीड येथील गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे. गंगाधर काळकुटे हे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. जरांगे यांची भेट घेऊन परत येत असताना वडीगोद्री गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडल्या. गाडीवर हल्ला केल्यावर दोनही अज्ञातांनी तेथून पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तापले होते. मात्र, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर येऊ शकलेली नाही. 

मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव… 

दरम्यान या सर्व घटनेनंतर गंगाधर काळकुटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “ मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेलं आंदोलन चिरडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच, आंदोलन चिरडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि मराठा आरक्षणाची लढाई कायम सुरू ठेवणार असल्याचं  म्हणाले. 

कोण आहेत गंगाधर काळकुटे? 

गंगाधर काळकुटे हे बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक आहेत. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मागील अनके वर्षांपासून सतत ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी असल्याचे पाहायला मिळते. बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्च्याचे ते समन्वयक देखील आहेत. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या सोबत असल्याचे देखील पाहायला मिळतात. जरांगे यांच्या मुंबई आंदोलनात देखील गंगाधर काळकुटे यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानंतर मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shambhuraj Desai : आंदोलनं, रास्ता रोकोतून तरुणांचं होतंय नुकसान, लोकांना वेठीस धरणं थांबवा, शंभुराज देसाईंचे जरांगेंना आवाहन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts