Sadabhau Khot expressed his desire to contest the Lok Sabha elections Kolhapur sangli marathi news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचं चित्र दिसत आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाहीर मेळाव्यातून केली आहे. 

खासदार धैर्यशील मानेंसमोर खोतांनी केली मागणी

मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होती, मात्र ऐनवेळी मतदार सघ हा शिवसेनेच्या वाटेला गेला. त्यामुळं मला उमेदवारी मिळाली नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी  मात्र, लोकसभा निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका खोत यांनी जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजीत केलेल्या शेतकरी कामगार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली. विशेष म्हणजे व्यासपीठावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते. यावेळी खासदार माने यांना पैरा फेडण्याची आठवण देखील खोत यांनी करुन दिली. 

शरद पवार यांच्यावर जहरी टीका

दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार  हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत, अशी टीका सदाभाऊ यांनी केली आहे. महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरु आहे, त्यामागं शरद पवार असल्याचे सांगत, तुतारी दोन वेळा वाजती, एकदा लक्ष्मीच्या पाऊलांनी नवरी यायला लागते तेंव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पाऊल चालायला लागली की तुतारी वाजते. यामुळे ही शेवटची घटका असून आता तुम्हाला तुतारी वाजवत जायचे आहे. कारण हे पाप तुमचे आहे.अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना मिळालेल्या पक्ष चिन्हावरुन जहरी टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

Sadabhau Khot : धैयशील माने भाग्यवान, वळवाच्या पावसाप्रमाणे आले आणि मी मशागत केलेल्या शेतात पीक घेतले; सदाभाऊ खोतांचा हसतहसत टोला

अधिक पाहा..

Related posts