Raj Thackeray Reaction Ulhasnagar Firing Case Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad Kalyan Maharashtra Marathi News



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray On  Ganpat Gaiwad Firing Case : उल्हासनगरमधील गोळीबार (Ulhasnagar) प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाचा वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, गणपत गायकवाड यांनी  इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याची चौकशी झाली पाहिजे.  भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गोळीबार करण्यात आला होता.  पोलिस स्थानकात गोळीबार केल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला होता.

राज ठाकरे म्हणाले,   एखादा माणूस पोलीस स्थानकात जाऊन  टोकाचे  पाऊल पाऊल उचलत असेल तर त्याची मानसीक स्थिती काय असेल याचा विचार केला पाहिजे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच  जाऊन गोळीबार करण्यापर्यंत कोणी आणले याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोर्टात ती चौकशी होणार असून सत्य बाहेर येईलच.  

महाराष्ट्राच्या राजकरणचा चिखल : राज ठाकरे 

सर्व ठिकाणी चिखल झाला आहे,  एक कार्यक्रमात गेलो समोर गेलो कोण कुठल्या पक्षाचा आहे कळलं नाही, यापूर्वी महाराष्ट्रमध्ये अस कधी  झालं नाही. लोकांनी यांना धडा शिकवला पाहिजे . मोदी ठीक आहे मात्र महाराष्ट्र हे योग्य नाही.  नवीन पिढी राजकारणात येत ते अशाच प्रकारची भाषा वापरतील. मी आधी बोलतो नंतर तुम्हाला पटते. महाराष्ट्रातील प्रश्न दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण करतात. महराष्ट्र हा सर्वात श्रीमंत राज्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले.  

निवडणूक आयोग पाच वर्ष काय करते? राज ठाकरेंचा सवाल

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात (Teachers Election Duty) ड्युटी लावण्यासंदर्भात मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाले . या विषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले,  निवडणूक आयोग पाच वर्ष काय करते. निवडणुकीसाठी यंत्रणा उभी करू शकत नाही.  शिक्षकांना इलेक्शन ड्युटी देऊन बघा. निवडणूक आयोग शिक्षकांवर कोणती कारवाई करते ते बघतोच

काय आहे प्रकरण?

 भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गोळीबार करण्यात आला होता. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार झाला होता.  

हे ही वाचा :

छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल

                        

अधिक पाहा..

Related posts