khosta-2 virus symptoms, करोनासारख्या नवीन खतरनाक व्हायरसने वाढवली चिंता, सायंटिस्टचा दावा – वॅक्सिनही फेल, ताबडतोब जाणून घ्या लक्षणे..! – scientists have found new virus like khosta 1 and khosta 2 in russia know its symptoms severity types and treatment( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोरोना विषाणूचा (coronavirus pandemic) प्रादुर्भाव नुकताच ओसरायला सुरुवात झाली होती, त्याच दरम्यान कोरोना व्हायरससारखाच एक नवीन व्हायरस आढळून आला आहे. या विषाणूचे नाव ‘खोस्ता-2’ (Khosta 2) असे सांगितले जात आहे. चिंतेची बाब ही आहे की, या व्हायरसवर उपलब्ध असलेल्या कोरोना विषाणूच्या (covid 19 vaccine) लसीचाही कोणताही परिणाम होत नाहीये. पीएलओएस पॅथोजेन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखात या व्हायरसबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संशोधकांना वटवाघळांमध्ये हा नवीन व्हायरस आढळला आहे. यामुळे मानवी लोकसंख्या धोक्यात येऊ शकते.

कोरोनाबद्दलही असे बोलले जात होते की तो वटवाघळांमुळे पसरतोय. शास्त्रज्ञांना 2020 च्या सुरुवातीला रशियामध्ये हा व्हायरस आढळला होता. पण त्यावेळेस ते लोकांसाठी धोक्याचे ठरेल असे कोणालाच वाटले नव्हते. साहजिकच, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याच्या वक्तव्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, त्याचे आता चिंतेमध्ये रूपांतर झाले आहे. खोस्ता 2 व्हायरस काय आहे, तो किती प्राणघातक आहे आणि त्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

खोस्ता 2 व्हायरस नेमका आहे तरी काय?

2020 च्या शेवटी खोस्ता 2 व्हायरस आढळून आला. त्यादरम्यान रशियामधील राइनोलोफस वटवाघळांमध्ये दोन क्लॅड 3 सेर्बेकोव्हायरस आढळले गेले. हे दोन व्हायरस होते ज्यात खोस्ता 1 मध्ये (Khosta-1) आणि राइनोलोफस फेरुमेक्विनम आणि खोस्ता 2 मध्ये (Khosta 2) आर हिप्पोसाइडरोस आढळून आले. सोची राष्ट्रीय उद्यानाजवळ मार्च-ऑक्टोबर 2020 दरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये या व्हायरसची ओळख पटली. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत होते.

(वाचा :- ही 8 लक्षणे दिसत असतील तर सावधान, असेल थायरॉइड कॅन्सर, गिळण्यास त्रास व आवाजात जडपणा समजू नका वातावरणाचा परिणाम)

खोस्ता व्हायरस किती प्रकारचे असतात

अभ्यासात असे आढळून आले आहे की खोस्ता व्हायरसचे दोन प्रकार आहेत – खोस्ता व्हायरस 1 आणि खोस्ता व्हायरस 2. हे दोन व्हायरस विषाणूजन्य वंशातील आहेत जे सार्स-कोव १ (SARS-CoV-1) आणि 2 पेक्षा वेगळे आहेत. त्यापैकी, खोस्ता 2 हा व्हायरस एक वेगळा प्रकार आहे, जो मानवी पेशींवर हल्ला करण्यास सक्षम आहे. खोस्ता-2′ (Khosta-2 Virus) म्हणून ओळखला जाणारा हा विषाणू सेर्बेकोव्हायरस नावाच्या कोरोनाव्हायरसच्या उप-श्रेणीचा आहे. हा SARS-CoV-2 चा एक प्रकार आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, आगामी काळात कोविडसारख्या साथीच्या रोगांपासून मानवांचे संरक्षण करण्यासाठी सरबेकोव्हायरस विरूद्ध सार्वत्रिक लस विकसित करण्याची गरज आहे. सरबेकोव्हायरस हा एक श्वसनाशी निगडीत विषाणू आहे, जो ब-याचदा पुनर्संयोजन प्रक्रियेतून जातो. कॉम्बिनेशन ही विषाणूजन्य स्ट्रेनची नवीन स्ट्रेन तयार करण्याची प्रक्रिया आहे.

(वाचा :- Liver Clean: लिव्हरमधील कचरा व विषारी पदार्थ झटक्यात साफ करतात हे 7 पदार्थ, एक्सपर्ट्स म्हणतात रोज न चुकता खा)

खोस्ता 2 व्हायरस किती घातक आहे?

-2-

अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना 2020 च्या उत्तरार्धात रशियन वटवाघळांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा सापडला. टीमने दोन नवीन विषाणू शोधले असून त्यांना खोस्ता 1 आणि खोस्ता 2 अशी नावे दिली आहेत. त्याच्या शोधात खोस्ता 1 हा मानवांसाठी जास्त धोकादायक नसल्याचे आढळून आले आहे. पण खोस्ता 2 मध्ये काही त्रासदायक लक्षणे दिसून आली आहेत. सुरुवातीला तो हानिकारक नाही असे मानले जात होते. पण दुसर्‍या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ते मानवांना संक्रमित करू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की खोस्ता 2 (Khosta-2) हा रशियामध्ये सापडलेला सरबेकोव्हायरस आहे, जो SARS-CoV-2 सारखाच आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की हा खोस्ता २ व्हायरस समान प्रवेश यंत्रणेचा वापर करून मानवी पेशींना संक्रमित करू शकतो.

(वाचा :- रिसर्चमध्ये दावा – 2040 पर्यंत 17.5 मिलीयन लोकांना होणार डायबिटीज, तुमचा नंबर लागू नये म्हणून लगेच करा हे उपाय)

आव्हाने काय आहेत

‘विषाणूमध्ये मानवी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता असल्याचे पाहून आश्चर्य वाटले’. खोस्ता 2 हे मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि सीरम या दोन्हींना प्रतिरोधक असल्याचेही संघाला आढळून आले. या विषाणूवर SARS-Cov-2 ची लस वापरली गेली. खोस्ता व्हायरसचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना असे आढळून आले आहे की, खोस्ता बॅट सरबेकोव्हायरस हे मानवी SARS-CoVs पेक्षा अनुवांशिकदृष्ट्या वेगळे आहेत कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक प्रणालीला विरोध करणार्‍या आणि रोगजनकता बिघडवणार्‍या विशिष्ट जनुकांसाठी अनुवांशिक माहिती एन्कोडिंगचा अभाव आहे.

(वाचा :- कोलेस्ट्रॉल वाढल्याचे हे 7 संकेत ताबडतोब समजून घ्या, योग्य वेळी ही 3 कामे केली नाही तर कधीही येईल हार्ट अटॅक..!)

या व्हायरसचा माणसांना किती धोका

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, खोस्ता 2 व्हायरस कोरोना विषाणूच्या विरूद्ध असल्याने मानवांमध्ये गंभीर रोग निर्माण करण्याची क्षमता यामध्ये नाही. पण तरीही याचे माणसांमध्ये संक्रमण होऊ शकते आणि यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जर ते कोविडच्या जीनमध्ये मिसळले ज्यामुळे कोरोना व्हायरस होतो तर अशा परिस्थितीत त्याचा प्रसार दर आरोग्य निरीक्षकांसाठी आणखी एक डोकेदुखी ठरणार आहे.

(वाचा :- Diet tips : झपाट्याने होईल वेटलॉस, कधीच होणार नाही डायबिटीज, फक्त आजपासूनच खायला घ्या हेल्दी फॅटचे हे 7 पदार्थ)

यावर कोरोनाची लस प्रभावी आहे का?

संशोधक टीमने सांगितले की, अलिकडच्या वर्षांत शेकडो सरबेकोव्हायरस सापडले आहेत, विशेषत: आशियातील वटवाघळांमध्ये. परंतु यापैकी बहुतेक मानवी पेशींना संक्रमित करू शकत नाहीत. डब्ल्यूएसयू विषाणूशास्त्रज्ञ लेटको यांनी सांगितले की, ‘आमच्या संशोधनातून पुढे असे दिसून आले आहे की हा सरबेकोव्हायरस आशियाबाहेरील वन्यप्राण्यांमध्ये वाढत आहे. यामुळे जगभरातील लोकांच्या आरोग्याला आणि SARS-CoV-2 विरुद्ध सुरू असलेल्या लस मोहिमांना धोका निर्माण झाला आहे. शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळून आले आहे की, वॅक्सिन किंवा संसर्गामुळे मानवी शरीरात तयार होणा-या कोणत्याही मानवी अॅंटिबॉडीज या व्हायरसला निष्प्रभ किंवा निकामी करू शकत नाहीत. याचाच अर्थ स्पष्ट संकेत आहे की, सध्याच्या कोरोना लस किंवा कोरोना संसर्गापासून तयार होणा-या अँटीबॉडीज खोस्ता-2 व्हायरसपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकत नाहीत.

(वाचा :- वेटलॉस, फिट बॉडी, सेक्सी फिगर बनवण्याची लालच आहे हार्ट अटॅकला जबाबदार? CDC ने सांगितले ‘इतका’ वेळच करा एक्सरसाइज)

खोस्ता 2 ची लक्षणे

-2-

हा व्हायरस सध्या रशियामध्ये आढळून आला आहे आणि आतापर्यंत संसर्गाची काही प्रकरणे आणि संसर्गाची तीव्रता आढळून आली आहे. खोस्ता 2 व्हायरसने एखाद्या व्यक्तीला संसर्ग केल्यावर कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

(वाचा :- 41 दिवस व्हेंटिलेटरवर होते राजू श्रीवास्तव, एकदा व्हेंटिलेटरवर गेलेला माणूस परत बरा होतो का व गॅरंटी किती असते?)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related posts