jcb falls in water, VIDEO: भीषण दुर्घटना! पूल तोडण्यासाठी बुलडोझर आला; तोडकाम करताना चालकासह कालव्यात कोसळला – up bulldozer action goes wrong as jcb falls into water during bridge demolition( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. पानिपत खटिमा मार्गावर गंग कालव्यावर असलेला जुना पूल पाडण्याचं काम सुरू होतं. पूल पाडण्यासाठी जेसीबी आला होता. या पाडकामादरम्यान जेसीबी कालव्याच्या पाण्यात कोसळला.

 

मुझफ्फरपूर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. पानिपत खटिमा मार्गावर गंग कालव्यावर असलेला जुना पूल पाडण्याचं काम सुरू होतं. पूल पाडण्यासाठी जेसीबी आला होता. या पाडकामादरम्यान जेसीबी कालव्याच्या पाण्यात कोसळला. जेसीबीचा चालकदेखील पाण्यात पडला.

जेसीबीचा चालक पाण्यातून कसाबसा बाहेर आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी पोहोचले. हा अपघात मोबाईलमध्ये कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या पानिपत खटिमा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. याच कामाच्या अंतर्गत कालव्यावरील जुना पूल पाडण्याचं काम सुरू होतं. जेसीबी मशीनच्या मदतीनं पूल पाडण्यात येत होता.

पुलाच्या एका बाजूला उभा असलेला जेसीबी समोर असलेला भाग पाडत होता. पुलाचा समोरील भाग काही क्षणांत जमीनदोस्त झाला. मोठ्या प्रमाणात ढिगारा पाण्यात पडला. त्यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये जेसीबी उभा असलेला पुलाचा भागही कोसळला. त्यामुळे चालकासह जेसीबी कालव्यात पडला. सुदैवानं चालक बचावला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Related posts