‘या वयातही पवार साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद, पण आगामी निवडणुकीत…’; काय म्हणाले छगन भुजबळ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhagan Bhujbal नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात आले. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) अनेक वर्षानंतर रायगडावर गेले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुकीत तुतारी किती वाजेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 

नाशिक येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीत तुतारी किती वाजेल हे मी काही सांगू शकत नाही. एवढे वय असून तसेच शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे. एखादी नवीन चिन्ह मिळते तेव्हा या चिन्हाचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात करावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, जो पहिल्यापासून दिशाहीन आहे. तो पुढची दिशा काय ठरवणार? त्याला दिशा कळली तर पाहिजे की योग्य दिशा कोणती आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts