Basavaraj Patil Minister of State Basavaraj Patal’s ramram to Congress abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Basavaraj Patil : माजी राज्यमंत्री बसवराज पाटलांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसला चौथा मोठा धक्का 
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसतायेत. लातूर तालुक्यातील लिंगायत समाजाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार आहेत. मात्र २०१९मध्ये त्यांचा पराभव झाला, आणि तेव्हापासून ते साईडलाईन झालेत अशी चर्चा आहे. बऱ्याच काळापासून ते धाराशिवमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र णहाविकास आघाडीत धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पण त्याच वेळी महायुतीत देखील ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांना लोकसभेचं तिकीट द्यायचं असल्यास शिवसेनेसाठी आणखी कुठली तरी जागा भाजपला सोडावी लागेल. त्यामुळे सध्या तरी भाजपनं पाटलांना काय आश्वासन दिलंय, हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत काँग्रेसला बसलेला हा चौथा मोठा धक्का आहे. सर्वात आधी मिलिंद देवरा, मग बाबा सिद्दिकी, त्यानंतर अशोक चव्हाण आणि आता बसवराज पाटलांनी देशातील सर्वात जुन्या पक्षाला रामराम ठोकला आहे. 

[ad_2]

Related posts