women wearing hijab Rahul Gandhi Answering the student question aligad university marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi : ‘भविष्यात ते देशाचे पंतप्रधान (Prime-Minister) झाले तर हिजाब (Hijab) परिधान करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे मत काय? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, महिलांना जे घालायचे ते परिधान करण्याचा अधिकार आहे, असे माझे मत असल्याचं ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) उत्तर प्रदेशात सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी अलीगड विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी येथील विद्यार्थिनींची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षण, अधिकार आणि महिलांचे अभिव्यक्ती या विषयांवर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महिलांनी काय परिधान करावे ही त्यांची जबाबदारी आहे – राहुल गांधी

अलीगढ विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारले की, भविष्यात आपण देशाचे पंतप्रधान झालो तर हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे काय मत आहे? यावर राहुल गांधी म्हणाले की, महिलांना जे घालायचे ते परिधान करण्याचा अधिकार आहे, असे माझे मत आहे. महिलांना काय घालायचे आहे यावर ते पूर्णपणे अवलंबून असते. महिलांनी काय परिधान करावे ही त्यांची जबाबदारी आहे, असे माझे मत असल्याचे राहुल म्हणाले. त्यांना काय घालायचे आहे की नाही घालायचे हा त्यांचा निर्णय आहे. तुम्ही काय घालायचे हे इतर कोणी ठरवावे असे मला वाटत नाही.

 

महिलांच्या राजकारणातील सहभागावर राहुल काय म्हणाले?

विद्यार्थ्यांनी जेव्हा महिलांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले, तेव्हा ते म्हणाले की, राजकारण आणि व्यवसायात महिलांना पूर्ण प्रतिनिधित्व दिले जात नाही. त्यासाठी महिला उमेदवारांना जास्तीत जास्त संधी द्यावी, याचा विचार सर्वच राजकीय पक्षांना करावा लागेल. राजकीय पक्षांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे. आपल्या देशाच्या राजकीय रचनेत महिलांचा समावेश झाला पाहिजे. राहुल गांधी म्हणाले की, स्थानिक पातळीवर राजकारणात आजही महिलांचे अस्तित्व दिसून येते, त्या प्रधान किंवा नगरसेवकाच्या पातळीपर्यंत पोहोचतात, पण त्याहूनही वरचा मुद्दा आमदार किंवा खासदाराचा येतो तेव्हा महिला क्वचितच दिसतात. अशा परिस्थितीत महिलांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

भाजप कायद्याचा दुरुपयोग – राहुल गांधी

अलिगढ विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना आसाममधील एनआरसीबद्दल विचारले. त्यावर राहुल म्हणाले की, भाजप देशातील कायदे शस्त्रे बनवून वापरत आहे. ते भेदभावाचे राजकारण करत असून त्यातून कोणाचाही फायदा होत नाही.

 

हेही वाचा>>>

PM Modi : पंतप्रधान मोदी 27-28 फेब्रुवारीला महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांना भेट देणार, विविध प्रकल्पांचे करणार उद्घाटन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts