Lok Sabha Election Opinion Poll maharashtra nda vs india sharad pawar uddhav thackeray zee news nivadnuk survey maharashtra politics 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतर जरी स्पष्ट होणार असलं तरीही त्या संबंधित अनेक ओपिनियन पोल समोर येत आहेत. झी न्यूजच्या ओपिनियन पोलमधून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  महाराष्ट्रामध्ये भाजपप्रणित एनडीएला 45 जागा मिळतील तर विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ला केवळ 3 जागा मिळतील असं या सर्व्हेमधून सांगण्यात आलं आहे. 

या ओपिनियन पोलमुळे महाराष्ट्रातल्या महायुतीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीची चिंता मात्र वाढणार असल्याचं दिसतंय. 

देशातील 543 पैकी 329 जागांचा सर्व्हेमध्ये आतापर्यंत स्पष्ट झाला असून त्यामध्ये एनडीएला 181 जागा मिळतील असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असं दिसतंय. 

राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा भाजपला

राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं या सर्व्हेमध्ये म्हटलं गेलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मतदारांमध्ये कुणाला मत द्यायचं याबद्दल संभ्रम असल्याने ही स्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. 

इतर राज्यांचा सर्व्हे काय? 

गुजरात- 

एकूण जागा – 26 
भाजप – 26 
इंडिया – 0

पश्चिम बंगाल

टीएमसी – 24
एनडीए –  17
इंडिया – 1 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचं कारण काय? 

कल्याणकारी योजना – 28
राम मंदिर- 20
अन्य-  9
राष्ट्रवाद – 10
भ्रष्टाचार मुक्त शासन – 33 टक्के

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts