Surya and KL 50s Against South Africa, Live सामन्यात सूर्याने सर्वांची मने जिंकली; केएल राहुलसाठी काय केलं तुम्हाला कळालं का? – india vs south africa t20i series suryakumar gives the chance to kl rahul to complete his half century as same dhoni did for virat kohli( प्रगत भारत । pragatbharat.com)

तिरुअनंतपुरम: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्यांचा ८ विकेटने पराभव केला. या सामन्यात केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाजीचे हीरो ठरले आणि दोघांनी अर्धशतक झळकावले. ग्रीनफील्डची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. अर्शदीप सिंगने ३ आणि दीपक चहरने २ असे सामन्याच्या सुरुवातीलाच बड्या फलंदाजांचे एकूण ५ बळी घेत दक्षिण आफ्रिकेला सावरण्याची संधीच दिली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला लवकर बाद करण्यात यश मिळवले, पण राहुल आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी केली.

१७व्या षटकात सूर्यकुमार यादवने केवळ आपले अर्धशतकच पूर्ण केले नाही तर केएल राहुललाही आपले अर्धशतक पूर्ण करण्याची संधी दिली. १६वे षटक सुरू होण्यापूर्वी सूर्या ३९ धावांवर होता, तर केएल राहुल ४३ धावांवर होता, परंतु ३६० डिग्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या सूर्याने दोन चौकार मारले आणि थेट ४८ धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे राहुलला डॉट बॉलला सामोरे जावे लागत होते पण त्याने ही धावा केल्या होत्या.

अशा स्थितीत सूर्याने शेवटच्या षटकात एकेरी धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या फक्त स्वतःचे अर्धशतक ठोकत शांत नाही बसला, त्याने केएल राहुललाही अर्धशतक पूर्ण करून सामना संपवण्याची संधी दिली. केएल राहुलही ही संधी कुठे गमावणार होता आणि मग त्याने शम्सीला न जुमानता षटकार ठोकून टीम इंडियाला विजय तर मिळवून दिलाच, पण त्याचं अर्धशतकही पूर्ण केलं.

धोनीने विराटला संधी दिली होती

असाच काहीसा प्रकार २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घडला होता. त्यावेळी विराट अर्धशतक झळकावत खेळत होता, धोनी मैदानात आला, भारताला विजयासाठी एक धाव हवी होती, तो षटकाचा शेवटचा चेंडू होता. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सेलिब्रेशनसाठी तयार होता, त्यामुळे धोनीने फक्त चेंडू रोखला आणि धावा काढल्या नाहीत. त्यामुळे कोहलीला सामना संपवण्याची संधी मिळाली.

Related posts