R Ashwin 4 overs against SA, अर्शदीप, सूर्या आणि राहुलवर भारी पडला अश्विन; एकही विकेट न घेता पाहा कसा काय ठरला हीरो – india vs south africa t20i ravichandran ashwin crazy spell in 4 overs with maiden over in a first match( प्रगत भारत । pragatbharat.com)

तिरुवनंतपुरम: ग्रीनफील्ड स्टेडीयमवर बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला केवळ १०६ धावांवर रोखले. नंतर भारताने हे लक्ष्य २ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या, पण या सामन्यात एकही विकेट न घेणाऱ्या रविचंद्रन अश्विननेही वर्चस्व गाजवले. कालच्या सामन्यातील अश्विनच्या कामगिरीबद्दल, जाणून घेऊया…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात रविचंद्रन अश्विनने ४ षटके टाकली. यामध्ये त्याने केवळ ८ धावा दिल्या, ज्यात एका मेडन ओव्हरचा समावेश होता. रविचंद्रन अश्विनला एकही विकेट मिळाली नाही, पण त्याच्या २४ चेंडूंच्या कोट्यातून त्याने १६ डॉट बॉल टाकले, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर खूप दडपण होते. दक्षिण आफ्रिका सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सावरण्याचा प्रयत्न करत असताना रविचंद्रन अश्विनने आपल्या दमदार स्पेलने त्यांच्यावर अधिक दबाव आणला. टी-२० क्रिकेटमध्ये सतत धावा थांबवणे खूप अवघड असते, पण रविचंद्रन अश्विनने अनेक प्रसंगी ते दाखवून दिले आहे. बुधवारचा सामनाही असाच होता.

Live सामन्यात सूर्याने सर्वांची मने जिंकली; केएल राहुलसाठी काय केलं तुम्हाला कळालं का?

विश्वचषकात अनुभव कामी येईल

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाच्या टी-२० संघात आपली जागा बनवली. रविचंद्रन अश्विन फार विचारपूर्वक गोलंदाजी करतो आणि त्याच्या रणनीतीच्या जोरावर फलंदाजांना मात देण्याची क्षमता त्याच्यात आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.
आता टीम इंडिया टी-२० विश्वचषकासाठी (T-20 World Cup) सज्ज असताना रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त आहे आणि युझवेंद्र चहल खराब फॉर्मशी झुंजत आहे. मग रविचंद्रन अश्विनचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपयोगी पडू शकतो, जो प्रत्येक चेंडू मागे विचार करत गोलंदाजी करतो.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवला मिळाली गूड न्यूज, पाहा नेमकं

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Related posts