Rohit Sharma on Ind Vs Sa 1st T20i, १०७ धावांचे टार्गेट असून देखील रोहित घाबरला होता; मॅच झाल्यानंतर एका वाक्यात केला विजयाचा खुलासा – scoring runs on pitch of thiruvananthapuram was not easy this fear was haunting the match said rohit sharma( प्रगत भारत । pragatbharat.com)

तिरुवनंतपूरम: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ८ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि दीपक चहल यांनी सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून आफ्रिकेचा संघ सावरलाच नाही, त्यांना २० षटकात फक्त १०६ धावा करता आल्या. भारताने देखील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना लवकर गमावल्यानंतर देखील विजयाचे लक्ष्य १६.४ षटकात पार केले.

सामना झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने सोपा विजय मिळवला असला तरी या पिचवर फलंदाजी करणे सोपे नव्हेत, आम्ही लवकर विकेट घेतल्यामुळे विजय मिळवता आला. अशा प्रकारच्या सामन्यातून खुप काही शिकण्यास मिळते. आम्हाला कल्पना होती की गोलंदाजांना मदत मिळेल. संपूर्ण सामन्यात पिचमध्ये ओलावा होता. शॉट खेळण्यास अवघड ठरत होते. दोन्ही संघांना जिंकण्याची संधी होती पण आम्ही विकेट घेतल्या आणि तिच गोष्ट निर्णायक ठरली.

वाचा- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपने इतिहास घडवला; आजवर कोणीही करू शकले नाही असा पराक्रम

रोहित पुढे म्हणाला, आम्ही सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ५-६ विकेट घेतल्या. जी परिस्थिती असते त्यानुसार योजना करावी लागते. आमच्या गोलंदाजांनी देखील तेच केले. आम्हाला कल्पना होती की १०७ धावांचे लक्ष्य सोप असणार नाही. अनेक वेळा परिस्थिती समजून शॉट निवडावे लागतात.

वाचा- Live सामन्यात सूर्याने सर्वांची मने जिंकली; केएल राहुलसाठी काय केलं तुम्हाला कळालं का?

सूर्यकुमार आणि राहुलचे कौतुक

सामन्यात नाबाद अर्धशतकी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांचे रोहितने कौतुक केले. सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर या दोघांनी ज्या पद्धतीने डाव सावरला ते कमालीचे होते. एकाने विकेट टिकवली तर दुसराने धावा केल्या, जे फार महत्त्वाचे असते.

Related posts