Team india Cricketer Suryakumar yadav education details( प्रगत भारत । pragatbharat.com)

Suryakumar yadav education details: टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादव हा टिम इंडियाचा मॅचविनर म्हणून ओळखला जातो. त्याने अनेकदा तारणाहर बनून टिमला विजयी पथावर नेले आहे. एकदिवसीय आणि टि २० सामन्यांमध्ये त्याने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. दरम्यान सुर्यकुमार यादवच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

सुर्यकुमार यादवने चेंबुरच्या अणुशक्ती नगर केंद्रीय विद्यालयामधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने अणूउर्जा ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईतील पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

त्याचे वडील अशोक कुमार यादव हे बीएआरसीमध्ये इंजिनीअर आहेत.लहानपणापासूनच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटनची आवड होती. पण एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट किंवा बॅडमिंटन यापैकी एक निवडण्यास सांगितले. यानंतर सुर्यकुमारने क्रिकेट हा पर्याय निवडला. सूर्यकुमार यादव यांचे काका विनोद यादव हे त्यांचे पहिले क्रिकेट प्रशिक्षक होते.

सुर्यकुमार दहा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब वाराणसीहून मुंबईत आले आणि त्याच वर्षी त्याने आपल्या शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.मुंबईतील दिलीप वेंगसरकर यांच्या ‘वेंगसरकर क्रिकेट अकादमी’मधून त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. 2010 मध्ये त्याने दिल्ली विरुद्ध प्रथम श्रेणी हंगामात मुंबईकडून खेळताना 89 चेंडूत 73 धावा केल्या होत्या.

टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार
Ranbir Kapoor Birthday: दहावी पास झाल्यावर सर्वांना पार्टी पण पुढचं शिक्षण अर्धवट…रणबीर कितवी शिकलाय?
2012 मध्ये, सूर्यकुमार आर. ए.पोदार कॉलेजमध्ये त्याची पत्नी देविशाला पहिल्यांदा भेटला. देविशा सुर्यकुमारला सुर्यकुमारचे क्रिकेट आवडत होते तर सूर्यकुमार देखील देविशाच्या नृत्याने प्रभावित झाला होता.

2012 च्या आयपीएल हंगामात ‘मुंबई इंडियन्स’ने त्याला पहिल्यांदा विकत घेतले होते पण सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, महेला जयवर्धने आणि किरॉन पोलार्ड यांच्यापेक्षा कमी प्रभाव पडल्यामुळे त्याला क्वचितच खेळण्याची संधी मिळाली.

तो त्याच्या सिग्नेचर शॉट ‘स्वीप शॉट’साठी ओळखला जातो. त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांविरुद्ध डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारण्याची क्षमता आहे.

सुर्यकुमार कॉमेडी चित्रपटांचा मोठा चाहता आहे, त्यामुळे त्याने ‘हेरा फेरी’ (2000) हा चित्रपट 500 पेक्षा जास्त वेळा पाहिला. त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या वर्कआउट्सचा सराव करतो. त्याला इंग्रजी गाणी आवडत नाहीत तसेच तो प्राणी प्रेमी देखील आहे.

Virat Kohli Education: शिक्षणात राहिला कच्चा पण क्रिकेटविश्वात ‘विराट’, कोहलीचं शिक्षण माहितेय का?

Related posts