neeraj chopra garba night, गोल्डन बॉय नीरज चोप्राने गरबावर ठेका धरला, पाहा व्हिडिओ – golden boy neeraj chopra attends special garba night in vadodara at national games 2022( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या दोन गोष्टींची धूम आहे. एक म्हणजे गरबा आणि दुसरी म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. दोन वर्षांनंतर बंधनमुक्त गरबा खेळण्याचा आनंद येथील नागरिकांना घेता येणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी येथे पारंपरिक गरबा बघायला मिळतो आहे. या गरब्या नृत्याची भूरळ बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या कलाकारांना जशी आहे, तशीच ती खेळाडूंनाही आहे. याला ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राही अपवाद नाही. त्यानेही बुधवारी गरब्याचा आनंद लुटला. गुजरातमध्ये येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने अनेक आजी-माजी खेळाडू दाखल झाले आहेत. स्पर्धेचे अधिकृत उद्घघाटन आज (गुरुवारी) होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यात ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राही सहभागी होणार आहे. नीरज चोप्राने राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली असली, तरी त्या राष्ट्रीय खेळांच्या कुंभमेळाच्या उद्घघाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे. या सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढविणार आहे. त्या पूर्वी शहरातील काही कार्यक्रमात नीरज चोप्राने हजेरी लावली.

वाचा- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपने इतिहास घडवला; आजवर कोणीही करू शकले नाही असा पराक्रम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर २४ वर्षीय नीरज देशभरातील तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. तेव्हा त्याच्या या प्रसिद्धीचा फायदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी करुण घेण्याचा प्रयत्न आयोजक करीत आहेत. नवरात्रात गुजरातमध्ये गरब्यांचा जल्लोष पाहायला मिळतो. बडोदा येथील अशाच एका नवरात्रोत्सवात नीरज चोप्रा सहभागी झाला होता. या वेळी त्याने गरबावर ठेका धरला. यानंतर त्याने व्यासपीठावरून येत केम छो म्हणत बडोद्याच्या लोकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी उपस्थितांनी नीरजच्या नावाचा जल्लोष केला.

वाचा- १०७ धावांचे टार्गेट असून देखील रोहित घाबरला होता; मॅच झाल्यानंतर एका वाक्यात केला विजयाचा खुलासा

नीरज आता आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याच्या तयारीपूर्वी त्याने थोडा वेळ विश्रांती घेणे पसंत केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रथमच गुजरातमध्ये होत आहे. ही स्पर्धा १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Related posts