महिलांसाठी धावणे जितकं फायद्याचं तितकं पुरूषांसाठी नाही, Heart Attack चा धोका पुरूषांना अधिक, स्टडीत खुलासा – world heart day running puts men at risk of heart attack and stroke also its helpful for women study says



( प्रगत भारत । pragatbharat.com)

दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस (World Heart Day 2022) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे हृदयाच्या आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे. तसेच याच्याशी संबंधित असलेल्या आजारांच्या उपायांबद्दल लोकांना माहित देणे.

WHO ने 2021 रोजी जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, जगभरात 17.9 मिलियन लोक दरवर्षी हृदयाच्या आजाराने मृत्यूमुखी पडतात. हृदयाशी संबंधित आजारांमागे अनेक कारण आहेत. ज्यामध्ये जेनेटिक, चुकीची जीवनशैली, आहार आणि गरजेपेक्षा जास्त शारीरिक आणि मानसिक तणाव यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशातच एक संशोधन समोर आलं आहे ज्यामध्ये धावणे आणि हार्ट अटॅक यांच्यात खूप मोठा संबंध आहे. स्टडीमध्ये लिहिलंय आहे की, महिला आणि पुरूषांना धावणे हे दोघांसाठी समान फायदेशीर नसते. पुरूषांसाठी धावणे हे धोकादायक ठरू शकते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​काय म्हटलंय अभ्यासात?

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि बार्ट्स हार्ट सेंटर यांनी केलेल्या संशोधन अभ्यासात एक धक्कादायक शोध समोर आला आहे. या अभ्यासानुसार, लांब पल्‍ल्‍याने धावल्‍याने पुरुषांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका संभवतो. तर महिलांसाठी धावणे अधिक फायदेशीर आहे. पुरुषांच्या बाबतीत, त्यांच्या प्रमुख धमन्या अपेक्षेपेक्षा कठीण होत्या. ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो, असे अहवालात म्हटले आहे.

​300 ऍथलीटवर करण्यात आला अभ्यास

300-

अभ्यासात असे दिसून आले की, मॅरेथॉन, आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि सायकलिंग इव्हेंटमध्ये नियमितपणे सहभागी झालेल्या पुरुषांचे रक्तवहिन्याचे वय त्यांच्या वयापेक्षा 10 वर्षे मोठे होते. तर धावण्याने स्त्रियांचे वय सरासरी सहा वर्षांनी कमी होते. अभ्यासाचे निष्कर्ष हे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या धावपटूंवर आधारित आहेत. अभ्यासात 300 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला. या लोकांनी 10 पेक्षा जास्त रनिंग स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच किमान 10 वर्षे नियमितपणे व्यायाम केला होता.

​धावण्याच्या संबंधित महत्वाच्या गोष्टी

महिलांना सहसा धावण्याचा सल्ला दिला जात नाही. गुडघेदुखी, टाच्यांच्या दुखण्यामुळे महिला धावण्यास घाबरतात. म्हणून या महिला व्यायामाकरता इतर पर्याय निवडतात.

​धावणे आरोग्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही ते नीट करत असाल तर धावणे कधीही चुकीचे होऊ शकत नाही, हे तज्ञ मान्य करतात. माणसाच्या वयानुसार, व्यायाम हा त्याला चालना देत असतो. सर्वात सोपा, कमी किमतीच्या व्यायामांपैकी एक म्हणजे धावणे. प्रभावीपणे धावण्यासाठी, प्रत्येकासाठी योग्य पोशाख आणि पादत्राणे आवश्यक आहेत.

महिलांनी स्पोर्ट्स ब्रा घालाव्यात. जोरात धावत असाल तर सरळ कधीच धावू नये. प्रथम आपल्या शरीराची स्थिती समजून घ्या आणि नंतर धावण्याचा विचार करा. वेग कधी घ्यायचा आणि कधी कमी करायचा हे समजून घेणे महत्वाचे आहे. तसेच धावताना ताबडतोब थांबू नका, थांबेपर्यंत हळू चालत रहा.

​जास्त धावू नका

जेव्हा तुम्हाला पाय आणि सांध्याच्या भागात सतत वेदना होत असतात तेव्हा धावणे थांबवणे गरजेचे आहे. याला पर्याय म्हणून तुम्ही सायकलिंग किंवा पोहणे यासारखे इतर व्यायाम करणे फायद्याचे ठरू शकतात. जास्त धावल्याने शरीराचे जास्त नुकसान होते. तज्ञांच्या मते, जास्त धावण्यामुळे प्लांटर फॅसिटायटिस होऊ शकतो, एक प्रकारचा जळजळ ज्यामुळे टाचांजवळ तीव्र वेदना होतात. जास्त व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते आणि एखाद्या व्यक्तीला संक्रमण होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या भूकेवरही होतो.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Related posts