ias roshan jacob crying seeing the injured child in hospital lakhimpur bus accident

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखीमपूर : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्ह़िडिओ तुमचं मनोरंजन करत असतात, तर काही व्हिडिओ तुमच्या डोळ्यात पाणी आणत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. दरम्यान नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात. 

व्हिडिओत काय? 
या व्हिडिओत हॉस्पिटमध्ये एक मुलगा बेडवर झोपलेला दिसत आहे. हा बेडवर झोपलेला मुलगा मृत्यूशी झूंज देत असल्याची माहिती आहे. या मुलाचे डॉक्टरांनी प्राण वाचवावे यासाठी त्याची आई डॉक्टर आणि स्थानिक अधिकाऱ्यांसमोर मदतीची याचना करताना दिसत आहे. 

या हॉस्पिटलमध्ये महिला आयएएस ऑफिसर (IAS Officer) देखील उपस्थित आहेत. या महिला आयएएस ऑफिसर त्या मुलाची डॉक्टरांकडून चौकशी करताना दिसत आहे. तसेच मुलाची ही बिकट परिस्थिती पाहून महिला ऑफिसरच्याही डोळ्यात पाणी येत आहे. या संदर्भातला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

घटनाक्रम काय? 
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Khiri) येथे धौराहाराहून लखनौला जाणारी बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. राष्ट्रीय महामार्ग 730 वरील आयरा पुलावर हा अपघात झाला. हा अत्यंत भीषण अपघात होता. या घटनेत 10 जण जागीच ठार झाले तर 41 जण जखमी झाले. या जखमींपैकी 12 जणांना लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तर इतरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

जिल्हयातील ही भीषण घटना पाहून लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जेकब (IAS Roshan Jacob) रूग्णालयात रूग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी एक अपघातग्रस्त लहान मुलगा बेडवर झोपून रडत होता. या मुलाची आई देखील हंबरडा फोडून रडत होती. यावेळी महिला आयुक्त रोशन जेकब (IAS Roshan Jacob)  अपघातात जखमी झालेल्या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करतात. तसेच त्याच्या उपचाराची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही देतात. या दरम्यान लहान मुलाची बिकट अवस्था पाहून महिला आयुक्त रोशन जेकब (IAS Roshan Jacob) यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. या संदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

“लखीमपूर खेरी, यूपी येथे झालेल्या दुर्घटनेने दु:ख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)  यांनी ट्विट करून म्हटले आहे. 

दरम्यान या घटनेने संपुर्ण राज्य हादरलं आहे. तसेच लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जेकब (IAS Roshan Jacob) यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

Related posts