Must keep these 5 things in your bag while going to office Buy cheap from Flipkart Sale

( प्रगत भारत । pragatbharat.com)

These 5 Things Must Be In Your Office Bag: कोरोनाचं संकट ओसरताच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कर्मचारी ऑफिसमधून काम करत आहेत. वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला घरातच सर्व बाबी सहज उपलब्ध होत होत्या. त्यामुळे ऑफिसला जाताना आपल्याला काही वस्तूंची उणीव भासू शकते. त्यामुळे काही वस्तू आपल्या बॅगेत असणं आवश्यक आहे. फ्लिपकार्टवर सेल सुरू असून आपल्याला या वस्तू स्वस्तात मिळू शकतात. 

किबोर्ड आणि माउस: ऑफिसमध्ये लॅपटॉपवर टायपिंग करणे आणि टच कीपॅडने काम करणे खूप कठीण होतं. त्यामुळे वायरलेस कीबोर्ड आणि माउस (Keyboard And Mouse) असणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे काम थोडे सोपे होईल. Lapcare कंपनीचा कीबोर्ड आणि माउस कॉम्बो फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. त्याची किंमत 3,999 रुपये असली तरी ती फ्लिपकार्टवर 1,372 रुपयांना उपलब्ध आहे.

लॅपटॉप स्टँड: लॅपटॉप डेस्कवर ठेवल्यानंतर प्रॉपर हवा मिळत नाही. त्यामुळे लॅपटॉप गरम होतो. यासाठी लॅपटॉप स्टँड असणं आवश्यक आहे. फ्लिपकार्टवर 500 रुपयांच्या आत लॅपटॉप स्टँड मिळेल. 

पेनड्राईव्ह: ऑफिस लॅपटॉपमध्ये पर्सनल डेटा ठेवता येत नाही. त्यामुळे पेन ड्राईव्ह असणं आवश्यक आहे. SanDisk ही पेनड्राईव्हच्या बाबतीत लोकप्रिय कंपनी आहे. 128 जीबी स्टोरेज असलेला पेन ड्राईव्ह तुम्ही फ्लिपकार्टवरून 779 रुपयांना विकत घेऊ शकता. 

हेडफोन: ऑफिसमध्ये अनेकदा ऑनलाइन मिटिंग करावी लागते. यासाठी बॅगेच हेडफोन असणं आवश्यक आहे. Fire-Boltt चा BH1200 Bluetooth Headset फ्लिपकार्टवर 1,899 विकत घेऊ शकता. अशी या सेटची किंमत 3,999 रुपये इतकी आहे.

बॅटरी बॅकअप: ऑफिसमध्ये फोन चार्ज करणं आवश्यक असतं. पण जवळ सॉकेट नसल्याने अनेकदा फोन चार्ज करता येत नाही. त्यामुळे बॅगेत पॉवर बँक असणं आवश्यक आहे. फ्लिपकार्टवर 2,499 रुपयांचा Ambrane 20000 mAh Power Bank फक्त 899 रुपयांना मिळतो.

Related posts