Indian Football Team Captain Sunil Chhetri Honoured By Fifa For His Career Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunil Chhetri Indian Football Team FIFA : भारतील फुटबॉल संघाचा (India National Football Team) स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीचा (Sunil Chhetri) गौरव फिफानं (FIFA) केला आहे. फिफानं भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या आयुष्यावर आधारीत तीन भागांची मालिका प्रसिद्ध केली आहे. फिफान ही मालिका प्रसिद्ध करुन सुनीलचा गौरव केला आहे. भारतातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटूंपैकी एक म्हणजे, सुनील छेत्री. देशात आतापर्यंत सर्वाधिक गोल केल्याचा विक्रम सुनील छेत्रीच्या नावावर आहे. तसेच, छेत्रीनं सर्वाधिक सामनेही खेळले आहेत. 

2005 मध्ये पदार्पण केल्यापासून सुनीलनं 131 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 84 गोल केले आहेत. या यादीत गोल मिशन म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) 117 गोलसह पहिल्या क्रमांकावर, तर जगप्रसिद्ध फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं (Lionel Messi) 90 गोलसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांनंतर सुनील छेत्री 84 गोलसह तिसऱ्या स्थानी आहे. 

फिफानं FIFA World Cup या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं की, “रोनाल्डो आणि मेस्सीबाबत सर्वांनाच माहीत आहे. आता सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूची कहाणी जाणून घ्या. सुनील छेत्री, कॅप्टन फॅन्टास्टिक आता फिफा प्लसवर उपलब्ध आहे.”

सध्या 38 वर्षी सुनील छेत्री लियोनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. छेत्रीच्या आयुष्यावर आधारित मालिकेतील पहिल्या भागात छेत्रीचं फुटबॉल क्षेत्रातील पदार्पण आणि त्याच्या फुटबॉल करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत दाखवण्यात आलं आहे.” 

पहिल्या एपिसोडच्या सारांशात सांगण्यात आलंय की, “पहिला एपिसोड आम्हांला तिथं परत घेऊन जातो, जिथून हे सगळं सुरू होतं. सर्वजण 20व्या वर्षी भारतात पदार्पण करतात. जवळचे सहकारी, प्रियजन आणि फुटबॉलमधील सहकारी त्यांची गोष्ट सांगण्यास मदत करतात.” Related posts