International Translation Day 2022 history theme( प्रगत भारत । pragatbharat.com)

International Translation Day 2022 : 30 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन (International Translation Day 2022) जगभरात साजरा केला जात आहे. भाषा व्यावसायिकांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी आणि अनुवादाचे जागतिक महत्त्व मान्य करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान हा दिवस साजरा करण्याचा इतिहास, याचे महत्व फार कमी जणांनाच माहिती आहे. आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवसाची सुरुवात केव्हा आणि का झाली हे जाणून घेऊया.

सेंट जेरोम यांच्या पुण्यतिथीला दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा केला जातो. सेंट जेरोम हे बायबलचे भाषांतरकार आहेत. जे भाषांतरकारांचे संरक्षक संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या स्मरणार्थ हा खास दिवस साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन कधी सुरू झाला?
आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस, FIT द्वारे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय दिवस, 1991 मध्ये जगभरातील भाषांतर समुदायाची एकता दर्शविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर (FIT) ची स्थापना 1953 मध्ये झाली. 1991 मध्ये, FIT ने जगभरातील भाषांतर समुदायाची ओळख वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

Ranbir Kapoor Birthday: दहावी पास झाल्यावर सर्वांना पार्टी पण पुढचं शिक्षण अर्धवट…रणबीर कितवी शिकलाय?
त्यानंतर, 24 मे 2017 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 30 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन म्हणून घोषित करणारा ठराव मंजूर केला. तेव्हापासून भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी हा खास दिवस जगभरात साजरा केला जातो.

टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाची थीम ‘ए वर्ल्ड विदाउट बॅरियर’ (A World Without Barriers’) ही आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ने आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन 2022 साजरा करणारी वार्षिक पोस्टर स्पर्धा देखील जाहीर केली आहे. FIT नुसार, स्पर्धा कोणत्याही व्यावसायिक डिझायनरसाठी ही स्पर्धा खुली आहे.
टिम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवचे शिक्षण किती? जाणून घ्या

Related posts