JNU विद्यापीठात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना, विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी, कुठे लाठीमार, तर कुठे सायकल फेकल्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
JNU : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. महाविद्यालयात सर्वसाधारण सभा सुरू असताना ही घटना घडली. या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही हाणामारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये गुरुवारी रात्री झाली. या हल्ल्यात 3 विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.

JNU मध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. वास्तविक, गुरुवारी रात्री निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा सुरू होती. या बैठकीदरम्यान काही विद्यार्थ्यांनी अभाविपच्या उमेदवाराला मंचावरून बोलू दिले नाही, असं सांगण्यात येत आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या गटात बाचाबाची होऊन विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत अभाविप आणि इतर विद्यार्थ्यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत.

या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर

विरुद्ध पक्षातील विद्यार्थ्यांनी याला अभाविपच्या विद्यार्थ्यांची गुंडगिरी म्हणत अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचं सांगितलंय. त्याचवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थी याला डाव्या विचारसरणीचा हल्ला म्हणत आहेत. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

दोन्ही पक्षांच्या तक्रारी, चौकशी सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारी आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तक्रारींची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. आजकाल जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्याअंतर्गत सर्व शाळांमध्ये एक-एक करून सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जात आहेत.

मुस्लिम विद्यार्थ्यांना वगळल्याचा अभाविपचा आरोप

एआयएसएने एबीव्हीपीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना वगळल्याचा आरोपही केला आहे. “जेव्हा कोणताही मुस्लिम विद्यार्थी आगामी निवडणूक समितीसाठी त्याचे नाव सुचवतो, तेव्हा ते त्याला विरोध करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना धमकावून  लैंगिक आणि जातीय अत्याचारांचा वापर करून शाळेच्या कॅम्पसचे वातावरण खराब केले" असं त्यांनी म्हटंलय

हेही वाचा>>>

MP News : ‘ती’ एक साधारण महिला ‘हमाल’, पण तिच्या लग्नाला खासदारापासून ते आमदारांनी लावली हजेरी! कोण आहे ही महिला?

[ad_2]

Related posts