Devendra Fadanvis denied to go sharad pawar house for lunch meal baramati namo rojgar melava maharashtra politics marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने (Baramati Namo Rojgar Melava) बारामतीमध्ये येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) निमंत्रण दिलं होतं, पण व्यस्ततेच्या कारणामुळे आपल्याला हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) हे निमंत्रण नाकारलं आहे. त्या संबंधित त्यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहंलं असून त्यांचे आभारही मानले आहेत.

शनिवारी, 2 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. पण  व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे. 

Devendra Fadanvis : यावेळी तरी शक्य होणार नाही, व्यस्त कार्यक्रमांमुळे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण नाकारलं

आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.

ही बातमी वाचा: 

Sharad Pawar : नमो रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेवर शरद पवारांचं नाव, वादानंतर आता प्रशासनाची सारवासारव

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts