Majha Maharashtra Majha Vision 2024 CM Eknath Shinde attack on uddhav thackeray shiv sena Maharashtra Political Updates Lok Sabha Elections Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Eknath Shinde, Majha Maharashtra Majha Vision 2024 : आम्ही विकासाला महत्त्व दिलंय. नवीन महायुतीचं सरकार स्थापन करण्यापूर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, त्या सर्व आम्ही दूर केल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याचे हिताचे आणि विकासासाठीचे प्रकल्प आपण मार्गी लावले. एक विकासाची घोडदौड जोरात सुरु आहे. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रकल्पावर राबवले जात आहेत. मेट्रो 3 हा 13 किलोमीटरचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. ठाणे, रायगड, पालघर तिन्ही जिल्ह्यांची प्रगती होणार आहे. विकासाचा सर्व सामान्याला फायदा झाला पाहिजे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती. बाळासाहेब आणि पंतप्रधान मोदींचं फोटो लावून आमच्या उमेदवारांनी मतं मागितली आणि स्वत:चं सरकार स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं, हा खरा विश्वासघात होता. मतदारांशी विश्वसघात, आपल्या विचारांसोबत विश्वासघात, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता इशारा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, घरी बसणारा नको, फिल्डवर काम करणारा पाहिजे, जागेवर जाऊन मदत करणारा पाहिजे, घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारा माणूस लोकांना आवडत नाही. कोरोनामध्ये स्वत: हा एकनाथ शिंदे कोविडमध्ये पीपीई किट घालून फिरत होता.

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ला राजकीय नेत्यांची मांदियाळी

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ लाईव्ह पाहा :

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts