Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा ‘हा’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiva Damru Benefit in Marathi : गळ्यात नाग, डोक्यावर चंद्र, केसात गंगा, हातात त्रिशूळ आणि डमरू असं महादेवाची लीला अपरंपार आहे. येत्या शुक्रवारी 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्री म्हणजे महादेव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा करण्यात येते. महादेव शंकराच्या डमरुमध्ये विशेष शक्ती असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी डमरुची पूजा करताना डमरु मंत्राचा जप केल्यास अद्भूत लाभ होतो. (Shiv Shakti signified by Damru)

ज्योतिषतज्ज्ञ डॉ. जया मदन यांनी डमरुबद्दल उपाय सांगितले आहे. त्या म्हणतात की, तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव, संकट किंवा वाद असतील तर महाशिवरात्रीला डमरुच्या उपायामुळे त्यातून तुम्हाला फायदा होईल. महाशिवरात्री म्हणजे पुरुष आणि निसर्ग यांचा मिलन. (Mahashivratri 2024 Do This Remedy upay for Special Shakti in Mahadev Damru Happiness in Married Life Shiva Damru Benefit in Marathi )

डमरू हे दोन त्रिकोणी तुकड्यांचा जोड आहे, त्यापैकी एक ‘योनी’ – मादी आणि दुसरे ‘लिंगम’ – नर दर्शवते. या दोघांना एकत्र आणले की जीवन रूप निर्माण होतं.  डमरुच्या आवाजाने तुमच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. नकारात्मक विचार आणि नकारात्मक दृष्टीपासून आपलं संरक्षण होतं.  

वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी डमरूचा उपाय!

डॉ. जया मदनने सांगितलं की, महाशिवरात्रीला आपल्या घरात एखाद्या चित्राने किंवा ‘डमरू’ च्या कलाकृतीने सजवून आपलं वैवाहिक नातं अधिक गोड करु शकता. असे केल्याने, तुम्ही शिव-शक्तीचे आशीर्वाद मिळवता.

त्याशिवाय वैवाहिक जीवनातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या बेडरुममधील पलंगाच्या डोक्याच्या बाजूला मध्यभागी डमरुच्या एका बाजूला नवऱ्याचा आणि एका बाजूला बायकोचा फोटो लावावा. त्याशिवाय बेडरुममध्ये हा डमरु तुम्ही साऊथ वेस्ट ठेवू शकता. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts