Viral Video Comedian Munawar Faruqui Dismisses Sachin Tendulkar In Special Match After ISPL Opening Ceremony



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Street Premier League (ISPL) : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बुधवारी ठाण्यात फलंदाजी करताना दिसला. ISPL स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरनं उपस्थिती लावली होती. ओपनिंग सरेमनीनंतर सचिन तेंडुलकरनं फलंदाजी केली. टेनिस चेंडूवर असणाऱ्या स्पर्धेत सचिन तेंडुलकरनं फलंदाजी केली.  

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) स्पर्धेचा बुधवारी शुभारंभ झाला. लीग स्पर्धेची उद्घटान सामना क्रिकेटर्स मास्टर XI आणि बॉलीवूड स्टार्स खिलाड़ी XI यांच्यात सामना झाला. या सामन्यात सचिन तेंडुलकरनं आक्रमक फलंदाजी केली. सचिन तेंडुलकर यानं 16 चेंडूत 30 धावांचा पाऊस पाडला. पण सचिन तेंडुलकर स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारूखी याच्या चेंडूवर बाद झाला. 

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी10 क्रिकेट स्पर्धेच्या या सामन्यात फारुखीनने पाचवं षटक टाकलं. त्याने दुसऱ्याच चेंडूवर सचिन तेंडुलकरला बाद केले. तेंडुलकरनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मिसहिट झाला अन् सचिन झेलबाद झाला. सचिन बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला होता.  

या सामन्यात मास्टर्स 11 संघाने 10 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 95 धावा जमवल्या. सचिन तेंडुलकर आणि पठाण यांनी सर्वाधिक धावा जमवल्या. आयएसपीएल 2024 मध्ये सचिन तेंडुलकर गुंतवणूकदार आणि कोअर कमिटीचा सदस्य आहे. 

All about ISPL 2024  आयएसपीएल स्पर्धेबद्दल सर्व माहिती – 

ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीग स्पर्धा. हिंदी आणि दक्षिणेतील अभिनेत्यांनी सहा संघ घेतले आहेत. या स्पर्धेत सहा संघामध्ये 18 सामने खेळवले जाणार आहेत. 6 मार्च ते 15 मार्च यादरम्यान ठाण्यातील मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.

सहा संघ राऊंड रॉबिन पद्धतीने प्रत्येकाविरोधात खेळणार आहेत. यामधील आघाडीचे चार संघ सेमीफायनसाठी पात्र ठरतील.  भारतातील गुणवंत आणि प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.   प्रेक्षकांसमोर खेळाडूंना कौशल्ये दाखवण्याची आणि त्यांच्या क्रिकेटच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. 



Related posts