दत्तात्रय शिंदे (सर) यांचा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डाॅ. अनिल पाटील यांच्या हस्ते गुण गौरव

पुणे pragatbharat.com : रयत शिक्षण संस्थेचा यावर्षीचा माजी प्राचार्य एन.आर. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार दत्तात्रय बंडू शिंदे यांना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डाॅ. अनिल पाटील यांच्या हस्ते सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सभागृहात संपन्न झालेल्या गुण गौरव समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.   मानपत्र, शाल , पुष्पगुच्छ व रोख आकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. शिंदे हे 1994 पासून रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या कार्यकाळात त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास प्रकल्प, स्व. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा सत्यशोध प्रकल्प, बॅक ऑप इंडियाच्या माध्यमातून हिंदी राष्ट्रभाषा संवर्धन प्रकल्प, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी आनंद शिबीर, उन्हाळी सुट्टीतील झोपडपट्टीतील मुलांसाठी सत्यशोधन वर्ग, तसेच ‘जातीचे दाखले शाळेतच ‘ या मोहिमेअंतर्गत तिनशे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शिंदे यांनी मिळवून दिले. हे उपक्रम पथदर्शी ठरले आहे. शैक्षणिक लेख, कथा लेखन, नाट्य लेखन तसेच वडार समाजावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, ग्रंथालय चळवळ, व्याख्याने, अशा विविध कार्यात शिंदे यांचे उत्कृष्ट योगदान आहे. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल भोसरी येथील माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेAttachments area

Related posts