Nagpur Smuggling drugs from Mumbai with the help of railway coach attendants Two peoples Arrest Maharashtra News ABP Majha



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur : नागपुरात रेल्वे कोच अटेन्डंटच्या मदतीने मुंबईतून ड्रग्जची तस्करी, दोघांना अटक, दोघे पसार
नागपुरात रेल्वे कोच अटेन्डंच्या मदतीने मुंबईतून एमडी ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरच्या अजनी परिसरातून आतिश बागडे आणि गौरव कटारे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे २४१ ग्रॅम एमडी आढळलं. तर या प्रकरणातील सूत्रधार विशाल मेश्राम आणि विक्रांत मेश्राम फरार झाले आहेत. या टोळीने मुंबईतून येणाऱ्या रेल्वेमधील कोच अटेन्डंटच्या माध्यमातून तस्करी सुरु केली होती. रेल्वे कोच अटेन्डंटला मुंबईतून नागपूरपर्यंत पार्सल आणण्यासाठी प्रत्येक वेळेला पाच हजार रुपये दिले जायचे. दरम्यान रेल्वे कोच अटेन्डंटला त्या पार्सलमध्ये काय आहे याची कल्पना होती की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

Related posts