Punjab Crime News Nephew kills uncle who sexually assaulted him

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Punjab Crime : पंजाबच्या (Punjab Crime) लुधियानामध्ये एका जेष्ठ व्यक्तीचा हत्या करुन त्याचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुधियाना पोलिसांनी (ludhiana police) या जेष्ठ व्यक्तीच्या खूनाच्या प्रकरणात दोन तरुणांसह एका महिलेला अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत व्यक्तीच्या पुतणीनेच ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कामात मुलीच्या मामाच्या मुलानेही मदत केल्याचे समोर आले आहे.

गुरदीप सिंग (61) रा. बडोवाल असे मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. गुरदीप सिंग यांच्या भाचीनेच मामाचा मुलगा आणि त्याच्या एका साथीदाराला 50 हजार रुपयांची सुपारी देऊन काकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. काकाच्या हत्येनंतर पुतणीने त्याचा मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

का केली हत्या?

आरोपी महिलेने पोलिसांच्या तपासात या हत्येबाबत माहिती दिली आहे. गुरदीप सिंग आपल्यावर मानसिक आणि लैंगिक अत्याचार करत होता. वारंवार विरोध करुनही तो थांबत नव्हता. त्यामुळेच त्याला संपवण्याचा निर्णय घेतला आणि मामाच्या मुलाला गुरदीप सिंगच्या हत्येसाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली, असे आरोपी महिलनेने सांगितले आहे. आरोपी महिला ही विधवा असल्याचीही माहिती समोर आली आहे.

कशी झाली हत्या?

आरोपींनी बडोवाल येथे गुरमीत सिंगचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह एका बेडमध्ये भरला आणि रिक्षाने तो 9 किलोमीटर दूर मेलेले प्राणी फेकतात तिथल्या नाल्यात नेला. त्यानंतर आरोपींनी गुरमीत सिंगचा पेट्रोल टाकून जाळण्यात आला. मृतदेह जाळल्यानंतर दुर्गंधी येऊ नये आणि नाल्यामध्ये पाणी आल्यावर हाडे वाहून जावीत म्हणून जनावरे फेकायच्या जागेजवळ आणला होता. मात्र आजूबाजूच्या लोकांनी धूर पाहून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना मृतदेह जळत असल्याचे दिसले. तोपर्यंत गुरदीप सिंगच्या शरीराचा 80 टक्के भाग जळालेला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपींची चौकशी सुरु केली आणि तिघांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी दिलेले 50 हजार रुपयेसुद्धा ताब्यात घेतले आहेत.

पैशावरुन मित्रानेच केली हत्या

पंजाबमध्ये मित्रानेच पैशाच्या व्यवहारातून एकाचा वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मृतदेह शेतातच फेकून दिला होता. मृतदेहातून दुर्गंधी आल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत हा नेपाळमधील अछाम गावातील चौरापाटी गावचा रहिवासी होता. आरोपी शंकर बहादूर याला अटक करण्यात आली आहे

Related posts