ABP Cvoter Opinion Poll Lok Sabha Elections 2024 Bjp Nda India Alliance Seats Vote Percentage Pm Modi Jammu Kashmir Himachal Kerala Tamil Nadu South India



( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP C Voter Opinion Poll : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचारही सुरु झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती फक्त निवडणुकीच्या घोषणेची. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2024 ची निवडणूक जिंकून हॅटट्रिक करणार की, मोदींविरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) यश मिळणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार कुणाला किती जागा मिळणार? 2024 चा महासंग्राम कोण जिंकणार? , हे जाणून घ्या.

राजस्थानमधील परिस्थिती काय?

एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, राजस्थानात भाजपला निर्भेळ यश मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानात भारतीय जनता पक्ष काँग्रेसला क्लीन स्वीप देऊ शकतो. राजस्थानात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहे. या सर्वच्या सर्व 25 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 

गुजरातमध्ये भाजपला पुन्हा मोठं यश मिळण्याची शक्यता

गुजरातमध्येही भाजप पुन्हा एकदा सर्वच सर्व जागा जिंकण्याचा अंदाज आहे. गुजरातमधल्या लोकसभेच्या 26 जागा आहेत. यातल्या एकाही जागेवर इंडिया आघाडीला यश येणार नसल्याचं ओपिनियन पोलमध्ये समोर आलं आहे. मोदी-शाहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा अपयश येण्याची शक्यता आहे. 

दक्षिण भारतात इंडिया आघाडीला यश मिळणार?

दक्षिण भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत इंडिया आघाडीतला घटक पक्ष असलेल्या डीएमकेला सर्वाधिक 31 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार काँग्रेसलाही 8 जागांवर यश मिळू शकतं. एनडीएच्या पारड्यात तामिळनाडूतून एकही जागा पडणार नसल्याचं दिसतं आहे. 

केरळमध्ये यंदा काँग्रेस मुसंडी मारण्याची शक्यता

एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, केरळमधील 20 पैकी 16 जागा काँग्रेसला मिळू शकतात. त्यामुळे केरळमध्ये यंदा काँग्रेस मुसंडी मारण्याची शक्यता आहे. यूडीएफला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये भाजपला पुन्हा एकदा अपयश येताना दिसतं आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणात काय होणार?

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणातही भाजपला चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकू शकतो. तर हरियाणातल्या 10 पैकी 8 जागांवर भाजपच जिंकण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार, हरियाणात काँग्रेसला फक्त दोन जागा मिळू शकतात. 

जम्मू काश्मीर, लडाखमध्येही भाजपला मोठं यश

तिकडे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही भाजपला मोठं यश मिळताना दिसतं आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दोन तर ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार लडाखमधल्या एकमेव जागेवर भाजपचा खासदार निवडून येऊ शकतो. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होणार आहे.

‘या’ राज्यांमध्ये भाजपला क्लीन स्वीप

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एबीपी न्यूज सी वोटर सर्वेक्षणानुसार, भाजपला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थानमध्ये क्लीन स्वीप मिळू शकते. या चार राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Related posts