Arunachal Pradesh Assembly Election 2024 Ajit Pawar camp NCP releases candidate list

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पाठोपाठ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, ही उमेदवारी यादी अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदा अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) अरुणाचल प्रदेशातील याचुली, पंगिन, पक्के- केसांग, चांगलांग उत्तर, नामसांग, मेहचूका, मनियांग जेकु, चांगलांग दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेशात इतर पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  इतर जागांवर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीकडून लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत 6 उमेदवारांना जिंकून जनतेने आशीर्वाद दिला होता. आता देखील जनता आशीर्वाद देईल असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खालीलप्रमाणे

1) लिखा साया – याचुली विधानसभा

2) तपंग तलोह – पंगिन विधानसभा

3) लोमा गोलो – पक्के केसांग विधानसभा

४) न्यासन जोंगसम – चांगलांग उत्तर

5) नगोलिन बोई – नामसांग विधानसभा

6) अजू चिजे – मेहचुका विधानसभा

7) मोंगोल यामसो – मनियांग जेकू विधानसभा

8) वकील सलमान मोंगरे – चांगलांग दक्षिण विधानसभा

आणखी वाचा

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts