‘4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच…’ वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखडपणे मत मांडले आहे. सीएए लागू करण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधकांना अमित शहांना फटकारले आहे. कोरोना व्हायरसमुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब झाला. पीडित नागरिकांनाही नागरिकतेचा अधिकार आहे. सर्व विरोधी पक्ष मग ते असदुद्दीन ओवेसी असूदेत किंवा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल हे सर्व फक्त राजकारण करत आहेत. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही CAA आणू आणि अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देऊ, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे म्हटलं की, 2019 मध्येच दोन्ही सभागृहात हे विधायक मंजुर करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळं थोडा विलंब झाला. विरोधकांना तृष्टीकरणाचे राजकारण करुन त्यांची व्हॉट बँक मजबूत करायची आहे. देशातील लोकांना माहिती आहे की, CAA हा या देशाचा कायदा आहे. मी 4 वर्षांत किमान 41 वेळा म्हटले आहे की CAA लागू होईल आणि निवडणुकीपूर्वी होईल.

भाजप CAAच्या माध्यमातून नवीन व्हॉट बँक बनवत आहे का? या प्रश्नावरही आमित शहांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, विरोधकांकडे दुसरं सध्या दुसरं कोणतही काम नाहीये. ते जे आश्वासन देतात ते कधीच करत नाहीत, असा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. मात्र, पंतप्रधान मोदींचा इतिहास असा आहे की, भाजपने जे काही बोलले आणि नरेंद्र मोदी जे काही बोलतील ती काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे.

विरोधकांनी असं ही म्हटलं की सर्जिकल स्ट्राइक आणि एयर स्ट्राइकचा राजकीय फायदा आहे. तर काय आता दहशतवादाविरोधातही कारवाई करायची नाही का?, असा सवाल आमित शाह यांनी केला आहे. तसंच, कलम 370 हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही ते म्हणाले आहेत. 

ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असंही म्हटलं की, CAA कायदा कधीच मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकता सुनिश्चित करण्याला आम्हाला संपूर्ण अधिकार आहे. आम्ही या कधीच तडजोड करणार नाही. तो दिवसही दूर नाही जेव्हा भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येईल आणि तिथे होणारी घुसखोरी थांबवेल. तुम्ही असे राजकारण करून राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घुसखोरी करुन आणि निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही. ममता बॅनर्जी यांना आश्रय घेणारी व्यक्ती आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही.

Related posts