मुकेश अंबानींचा असाही भाऊ, ज्यानं रिलायन्समध्ये नोकरी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सोडला!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mukesh Ambani:  रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आजच्या घडीला त्यांची नेट वर्थ  960474  कोटी इतकी आहे. भारताबरोबरच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांच्या यादीत ही त्यांचे नाव आहे. पण यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्यांच्या मार्गातही अनेक अडथळे आले. मात्र, या अडथळ्यांवर मात करत त्यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीचे नाव मोठं केलं. 1983000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या प्रवासात मुकेश अंबानी यांना अनेक सहकाऱ्यांची साथ मिळाली. त्यातीलच एका व्यकीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुकेश अंबानी रिलायन्सचा कारभार पाहत असताना त्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांच्या या अडचणींचा काळात त्यांना त्यांच्या जवळच्या माणसांची साथ मिळाली. त्यापैकीच एक असलेल्या या व्यक्तीला आज मुकेश अंबानींचा दुसरा भाऊ म्हणून ओळखले जाते. त्यांचे नाव आहे आनंद जैन. आनंद जैन हे मुकेश अंबानींच्या भावाप्रमाणेच मानले जातात. कारण त्यांची मैत्री खूप जुनी आहे. शाळेत असल्यापासून त्या दोघांची मैत्री आहे. 

आनंद जैन हे 25 वर्षांपासून मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी त्यांनी रिलायन्स कॅपिटलचे उपाध्यक्ष आणि रिलायन्स समूह कंपनी इंडियन पेट्रो केमिकल्स लि.चे उपाध्यक्ष म्हणून काम केले. एका वृत्तानुसार, आनंद जैन हे मुकेश अंबानी यांचे प्रमुऱ सल्लागार म्हणूनही काम पाहतात. गंभीर मुद्द्यांवर निर्णय घेण्यापूर्वी अंबानी त्यांच्याशी चर्चा करतात व त्यांचा सल्ला घेतात. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, आनंद जैन यांना 1980 च्या दशकात रिलायन्समध्ये महत्त्व प्राप्त झाले. तेव्हा ते बॉम्बे स्टॉक एक्जचेंजमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या जाणाऱ्या मनू मानेकला नाकीनऊ आणले होते. तेव्हापासून त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले.

आनंद जैन एके काळी अब्जाधीश होते. 2007मध्येही फोर्ब्स इंडियाच्या 40 श्रीमंतांच्या यादीत ते 11 व्या स्थानी होते. विशेष म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीकडून एक रुपयाही पगार न घेताही कंपनीच्या निर्णयामागे त्यांचा मेंदू असल्याचे  म्हटले जाते. मुकेश अंबानी यांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीशी संबंधित जय कार्प लिमिटेडचे अध्यक्ष आनंद जैन यांना रियल इस्टेट, फायनान्स ते भांडवली बाजारापर्यंत अनेक व्यवसायांमध्ये सुमारे 30 वर्षांचा अनुभव आहे. 

मुकेश अंबानी आणि आनंद जैन यांनी मुंबईच्या हिल ग्रेंज महाविद्यालयातून शिक्षण घेतलं होतं. 1981 मध्ये मुकेश अंबानी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून परतले तेव्हा आनंद जैन यांनी रिलायन्स इंडस्ट्री जॉइन करण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या व्यवसायदेखील सोडला होता. आनंद जैन यांनी धीरुबाई अंबानी यांच्यासोबतही खूप जवळून काम केले आहे. 

आनंद जैन यांचा मुलगा हर्ष जैनदेखील व्यवसायिक आहे. 65,000 कोटी रुपयांची नेट वर्थ असणाऱ्या ब्रँडचा ते सहसंस्थापक आहे. हर्ष जैन हे फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 चे संस्थापक आहेत.

Related posts