who took ipl first ever wicket 2008 kkr vs rcb zaheer khan sourav ganguly marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलचे 16 हंगाम पार पडलेत. पण आयपीएलची पहिली विकेट कुणी घेतली? याबाबत तुम्हाला माहितेय का ? विसरलात ना? हो… कारण 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली होती. कोलकाता आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगला होता. या सामन्यात आयपीएलमधील पहिलेच शतक ठोकलं गेलं होतं. कोलकात्यानं सलामीचा सामना 140 धावांनी जिंकला होता. पण पहिल्या सामन्यात पहिली विकेट कुणी घेतली? याबद्दल मोजक्याच लोकांना माहिती नसेल. याबाबत जाणून घेऊयात..

आयपीएलची पहिली विकेट कुणी घेतली ? 

आयपीएलला 2008 मध्ये सुरुवात झाली. राहुल द्रविडचा आरसीबी आणि सौरव गांगुलीचा कोलकाता यांच्यात सलामीचा सामना रंगला होता. राहुल द्रविडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याकडून सौरव गांगुली आणि ब्रँडन मॅक्युलम यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही आरसीबीच्या गोलंदाचांचा खरपूस समचार घेतला. दोघांमध्ये 60 धावांची भक्कम भागिदारी झाली. पण सहाव्या षटक घेऊन झहीर खान आला. झहीर खानच्या पहिल्या चेंडूवर मॅक्युलमने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर सौरव गांगुलीने यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन गेला अन् स्लीपमध्ये उभं असलेल्या जॅक कॅलिसच्या हातात स्थिरावला. आयपीएलच्या इतिहास बाद होणारा पहिला फलंदाज सौरव गांगुली ठरला तर विकेट घेणारा गोलंदाज झहीर खान ठरला. 

आरसीबीचा 82 धावांवर खुर्दा – 

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभारला. कोलकात्याकडून ब्रँडन मॅक्युलम यानं नाबाद 158 धावांची खेळी केली. मॅक्युलमनं आपल्या विस्फोटक खेळीमध्ये 13 गगनचुंबी षटकार लगावले. त्याशिवाय 10 खणखणीत चौकारांचा पाऊसही पाडला. मॅक्युलमचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. गांगुली 10, रिकी पाँटिंग 20, डेविड हसी 12 धावांची खेळी केली.  आरसीबीकडून झहीर खान आणि जॅक कॅलीस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. कोलकात्यानं दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था दैयनिय झाली. आरसीबीचा संघ फक्त 82 धावांत गारद झाला. आरसीबीकडून एकाही फलंदाजाला 20 धावसंख्याही पार करता आली नाही.. राहुल द्रविड, वासीम जाफर, विराट कोहली, जॅक कॅलिस, कॅमरुन व्हाइट, मार्क बाऊचर यासारखे धुरंधर अपयशी ठरले. आरीसीबीकडून प्रविण कुमार यानं सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. कोलकात्याकडून अजित आगरकर यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याशिवाय अशोक डिंडा, सौरव गांगुली यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts