Ajit Pawar on Supriya Sule It is not enough to criticize Narendra Modi Amit Shah funds also need to be brought in Ajit Pawars attack on Supriya Sule



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar, Baramati : “लोकसभेत जाऊन फक्त पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करून चालत नाही. कामासाठी निधी पण लागत असतो. विरोध असला की, निधी मिळत नसतो. मला भरपूर दिलय. या संधी परत परत मिळत नसतात. देशातील जनतेने मोदींना पंतप्रधानन करण्याचं ठरवलं आहे”,असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते बारामती येथील सभेत बोलत होते. 

केंद्रातून निधी आणण्यासाठी आपल्या विचारांचा खासदार हवा

अजित पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू,लाल बहादूर शहत्री,इंदिरा गांधी यांनी चांगल काम केलं. संगणकाबाबत राजीव गांधी यांच्यावर टीका झाली,पण आता लाखो नोकऱ्या उपलब्ध झाल्या. बारामती विकासाबाबत तुम्ही परवा पाहिलं असेल,पोलीस मुख्यालय असेल,घर असतील,रस्ते असतील. चांगल्या पद्धतीने सुरु आहे. केंद्रातून निधी आणण्यासाठी आपल्या विचारांचा खासदार हवा आहे. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या मोदी करिश्मा आहे. स्वत: हिंमतीवर दोन वेळा सत्ता आणली. एकटे काम करतात. मोदींनी 9 वर्षात सुट्टी घेतली नाही. मोदी यांचा दिनक्रम आपण पाहतो आहे. जगात पाचव्या क्रमांक वर आहेत ते अजून वाढवू पाहत आहेत. आपण पण राज्यात काम करायच ठरवल आहे. इलेक्ट्रिक बस घेण्याचा विचार आहे,आपल्यात नसेल तर परदेशातून आणण्याचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

लोकसभा निवडणुकीत मोदींना सपोर्ट द्यायचा आहे

सीएए,राम मंदिर केलं. निवडणूक आली की हे म्हणतात, घटना बदलणार आहेत आणि टीका करतात. विकासाचा मुद्दा यांच्याकडे सांगायला नाही. आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे. माझी विनंती आहे की,लोकसभा निवडणुकीत मोदींना सपोर्ट द्यायचा आहे. त्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून आणायचा आहे. भावनिक होऊ नका,काहीजण आता फोन करतायत. 15 वर्ष फोन येत नव्हते पण आता करत आहेत.कस काय चाललय अस विचारत आहेत? असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

मी विकासला मत मागत आहेत. आचारसंहिते अगोदर सर्व काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. दोन ग्रुप आहेत गावागावात आता विनंती आहे,सरपंच जिरवायची म्हणून मतदान करून नका,सगळ्यांनी मतदान करा. मी तुमच्या विश्वासाला उतरलो तसा तुम्ही पण उतरा,पाठींबा द्या. मला राज्याचा निधी कमी पडतोय म्हणून केंद्राचा निधी हवा आहे, असंही आवाहनही अजित पवारांनी केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Electoral Bonds: निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा तपशील जाहीर, कोणत्या कंपनीने राजकीय पक्षांना किती निधी दिला?

अधिक पाहा..

Related posts